मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वाईट पद्धतीनं आली आहे. या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री संभावना सेठच्या वडिलांचं 8 मे रोजी कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं. अभिनेत्री संभावनाच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री संभावनाने आपल्या वडिलांचं निधन नाही बेजबाबदार कारभारामुळे हत्या झाल्याचा गंभीर आरोप रुग्णालयावर केला आहे. रुग्णालयातील परिस्थिती नेमकी त्यावेळी काय होती याचा एक व्हिडीओ शेअर करत तिने संताप व्यक्त केला आहे. 


संभावना सेठ येथेच थांबला नाही, तिने तिचे कडवे अनुभव सांगितले आणि पुढे लिहिले की, 'माझ्या वडिलांचा हा व्हिडिओ केल्यानंतर 2 तासांनी त्यांचं निधन झालं. त्यांचा मृत्यू झाला त्याऐवजी असं मला म्हणावं लागेल की त्यांची वैद्यकीय पद्धतीनं हत्याच करण्यात आली आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भीती माझ्या वडिलांना गमावण्याची होती.'



'आता माझ्य़ा वडिलांची अशा पद्धतीनं हत्या झाल्यानंतर मला कोणत्याच गोष्टीचं भय उरलेलं नाही. माझ्या वडिलांनी आयुष्यभर शिकवलेल्या सत्यासाठी संघर्ष करत राहिन. रुग्णालयाचा खरा चेहरा मी दाखवीन. मी माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण करीत आहे. आता मला या लढाईत तुमच्या पाठिंब्याची गरज आहे कारण मला माहिती आहे की या कठीण काळात रुग्णालयात असलेल्या प्रत्येकाला अशाच प्रकारचे वैद्यकीय दुर्लक्ष होत आहे आणि ते आपण सहन करत आहोत.' 


वडिलांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील अभिनेत्रीने केला आहे. शनिवारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत तिने आपल्या वडिलांची अवस्था आणि रुग्णालयाचा कारभार कसा सुरू आहे हे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमधून तिने रुग्णालयाच्या गलथान कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि वडिलांची हत्या केल्य़ाचा आरोप लावला.