Anshula Kapoor : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor malaika arora) मलायका अरोरा यांच्या नात्याला कायमच चाहत्यांचं प्रेम मिळालं. या सेलिब्रिटी जोडीप्रती प्रत्येक गोष्टीबाबत चाहत्यांच्या मनात कुतूहल असतं. अर्जुनच्या कुटुंबीयांच्या बाबतीतही हेच घडताना दिसत आहे. कारण, त्याची लाडकी बहीण प्रेमात पडलीये. इतकंच नव्हे तर तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या या नात्याची कबुलीही दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन कपूरची बहीण आणि बोनी कपूर यांची लेक अंशुला गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अशी तिची वेगळी ओळख बनवू पाहत आहे. तिच्या फॉसोअर्सचा आकडाही दिवसागणिक वाढतच चालला आहे. असं असतानाच अंशुलाच्या एका सोशल मीडिया पोस्टची सध्या तूफान चर्चा सुरु आहे. 


नात्यावर शिक्कामोर्तब...


अंशुला कपूर कुणा एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. पण, आता तिनं या व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत नात्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं आहे. (anshula kapoor and rohan thakkar) स्क्रीनराईटर रोहन ठक्कर आणि अंशुला रिलेशनशिपमध्ये आहेत. तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ही जोडी इंफिनिटी पूलमध्ये एक रोमँटीक पोझ देताना दिसत आहे. 


एकमेकांच्या नजरेत पाहताना ती दोघंही हरवून गेल्याचं फोटो पाहताक्षणी लक्षात येत आहे. 366 असं लिहित तिनं एक पांढऱ्या रंगाचा heart shape इमोजी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिला आहे. थोडक्यात या जोडीनं त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर जणू त्याची ग्वाहीच दिली आहे. 



अंशुलाची पोस्ट आणि कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया... 


तिथं अंशुलानं प्रियकरासोबत फोटो पोस्ट करायला आणि इथं कुटुंबीयांनी त्यावर व्यक्त व्हायला काय तो एकच वेळ. रिया कपूर, जान्हवी आणि खुशी कपूर यांनी आपल्या बहिणीला या क्षणी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे, तर अभिनेता संजय कपूरची पत्नी आणि अंशुलाची काकी, महिप कपूर हिनंही Cuties असं लिहित या जोडीच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. 


हेसुद्धा पाहा : Health Tips: केळंच नव्हे, 'ही' फळं खाल्ल्यावरही पाणी चुकूनही पिऊ नका 


स्वत:ची वेगळी ओळख तयार करू पाहणाऱ्या अंशुलानं आईच्या निधनानंतर मोठ्या धीरानं स्वत:ला आणि कुटुंबाला सावरलं. ज्यानंतर आता ती खासगी आयुष्यात एका नव्या टप्प्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.