मुंबईः मेट गाला फॅशन वीक 2022 मध्ये हॉलिवूडसह बॉलिवूड सेलिब्रिटी फॅशनचा जलवा दाखवत आहेत. आता आणखी एका हॉलिवूड सेलिब्रिटीने आपल्या लूकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मॉडेल कारा डेलेव्हिंगने ही फॅशनमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते. मेट गाला फॅशन वीकमध्येही कारानं हे सिद्ध केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रेड सूटमध्ये आलेल्या मॉडेल कारानं रेड कार्पेटवरच तिचा टॉप उतरवला, त्यानंतर ही छायाचित्रे समोर आली. मेट गाला 2022 हा पुरावा आहे की मॉडेल कारा डेलेव्हिंगने तिच्या लूकवर प्रयोग करण्यास घाबरत नाही. सोमवारी रात्री, कारा लाल डायर हाउट कॉचर सूटमध्ये रेड कार्पेटवर आली. यादरम्यान तिच्या हातात वॉकिंग स्टिकही होती. त्यानंतर रेड कार्पेटवर काराने तिचे जॅकेट काढून सर्वांना आश्चर्यचकित केले.



यादरम्यान कारा नक्कीच टॉपलेस झाली पण तिने तिचे शरीर सोनेरी रंगाने झाकून ठेवलं होतं. यासोबत तिनं गोल्डन चेन गळ्यात घातल्या होत्या.



यंदाचा मेट गालाचा ड्रेस कोड 'गिल्डेड ग्लॅमर' असा ठेवण्यात आला होता. त्यासाठी मॉडेल कारानं टॉपेलस होत गोल्डन लूक फ्लॉन्ट केला.