मुंबई : बॉलीवूड स्टार्सचे लग्न म्हणजे पाण्यासारखा लग्नाचा खर्च आलाचं. कोणी भारतात करत तर कोणी विदेशात जाऊन लग्नगाठ बांधत. मात्र हे स्टार्स लग्नात तुफान खर्च करतात. हा खर्च करतात तर करतातच त्याचबरोबर लग्नाचे आलिशान फोटो देखील विकतात. तेही लाखात नव्हे तर करोडोमध्ये, अशाच सेलिब्रिटींची तुम्हाला माहिती देणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. या शाही लग्नात पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच परदेशातूनही अनेक लोक आले होते. बॉलीवुड लाइफच्या माहितीनूसार विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाचे फोटो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सुमारे 80 ते 100 कोटींना विकले होते. 



प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न देखील बॉलिवूडच्या शाही विवाहांपैकी एक आहे. प्रियांकाने लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण वृत्तांनूसार प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो एका आंतरराष्ट्रीय मासिकाला 18 कोटी रुपयांना विकले.



विराट कोहली आणि अनुष्का शर्माने इटलीतील एका छोट्या गावात सात फेरे घेतले. लग्नानंतर दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी काही फोटो शेअर केले होते. पण वृत्तांनूसार या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या लग्नाचे फोटो एका मासिकाला विकले होते. यातून जे काही पैसे जमा झाले ते दान केले.



बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने परदेशी मूलगा जीन गुडइनफशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव केला आणि त्याला मिळालेले पैसे चॅरिटीला दिले.



सोनम कपूर आणि आनंद आहुजाने लग्नाचे फोटो एका मॅगझिनला दिले होते. मात्र त्यांनी नेंमके हे फोटो कितीला विकले होते याची माहिती मिळाली नाही.