मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात. मुळात या जगात अमर्याद काय असं म्हटलं असता प्रेम... हेच उत्तर समोर येतं. तुम्हीही कधी कोणावर प्रेम केलं असेल तर हे अगदी योग्य पद्धतीने समजू शकता. बॉलिवूडमध्येही काही अशी नाती चाहत्यांनी पाहिली, ज्यांनी एकमेकांवर अमर्याद प्रेम केलं. प्रेमात अनेकदा त्यांनी हद्दही ओलांडली... (Bollywood Celebrity Crazy Things have done in Love shahid kapoor kareena kapoor relationship)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी कलाजगतामध्ये एकेकाळी मोस्ट हॅपनिंग जोड्यांपैकी एक असणाऱ्या शाहिद कपूर आणि करीना कपूर या जोडीच्या ब्रेकअपवर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नव्हता. करीना शाहिदवरील प्रेमापोटी मांसाहाराचा त्याग करण्यापर्यंत पोहोचली होती. त्याच्यासाठी शाकाहारी होत करीनानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. 



आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचं नातंही तसंच. एक वेळ अशी होती, जेव्हा आमिरनं त्याच्या पत्नीसाठी रक्तानं पत्र लिहिलं होतं. त्यानं रीनाशी लपूनछपून लग्नही केलं होतं. 



अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांचं नातंही हिंदी कलाजगतातील एक गाजलेलं नातं. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झाल्यामुळं हेमा मालिनी यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्यात काही अडथळे निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत या जोडीत धर्मांतराचा निर्णय घेतला गेला होता. 



दीपिका आणि रणबीरच्या नात्यापासून कोणीही अनभिज्ञ नाही. ही अभिनेत्री रणबीरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती, की तिनं मानेवर RK ही आद्याक्षरं असणारा टॅट्टू काढून घेतला होता. 



प्रेमासाठी आणाभाका घेत संपूर्ण जगासमोर या नात्याची ग्वाही देणाऱ्यांमध्ये आणखी एका जोडीचा समावेश होतो. ही जोडी म्हणजे, करीना कपूर आणि सैफ अली खान. बेबोवरील प्रेमापोटी सैफनं त्याच्या हातावर मोठाला टॅट्टू गोंदवून घेतला होता.