बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत अवतरलं बॉलिवूड...चर्चा फक्त सना खानची...
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. यंदा कोण कोण आलं पार्टीत पाहा
मुंबईः बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. या पार्टीचं खास आकर्षण म्हणजे सलमान आणि शाहरूख खान.
सलमान आणि शाहरूखमधील दरी याच इफ्तार पार्टीत संपल्याचं सर्वश्रूत आहे. त्यामुळे या इफ्तार पार्टीची दरवर्षी जोरदार चर्चा होते. यंदाही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीला पोहोचले होते.
यंदा इफ्तार पार्टीत यंदा सलमानने ब्लॅक शर्ट आणि डेनिम पँट अशा पेहरावात हजेरी लावली.
शाहरूख खानही ब्लॅक कुर्ता-पायजमा असा आकर्षक पेहरावात पार्टीला आल्याचं दिसून आलं. यावेळी शाहरूखने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा केल्या .
सलमानसोबत वडील सलीम खान, सोहेल खान, अरबाज खान, अलवीरा खान आणि तिचा पती अतुल अग्निहोत्रीही इफ्तार पार्टीला पोहोचले. बाबा सिद्दीकी यांनी स्वतः सलीम खान यांचा हात धरून त्यांच्यासोबत फोटो काढल्याचं समजतंय
मिस युनिवर्स 2021 हरनाज संधूनेही इफ्तार पार्टीला हजेरी लावली. पार्टीतला तिचा लूक सर्वांनाच घायाळ करणारा होता. पार्टीत हरनाज ऑरेंज आणि ब्राऊन कुर्ता-सलवार अशा भारतीय पोशाखात दिसली
मिका सिंगनेही या पार्टीला हजेरी लावली. पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि डोळ्यांवर नेहमीचा काळा गॉगल अशा पेहरावात मिकाने पार्टीला हजेरी लावली.
या पार्टीत सर्वात जास्त चर्चा होती ती सना खानची. धर्मासाठी बॉलिवूडला रामराम करत सना खानने वेगळी वाट निवडली. तिच्या या निर्णयाची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती. इफ्तार पार्टीतही सना खान पारंपारिक बुरखा घालून पती अनस सईदसह सहभागी झाली.
कॉमेडियन कृष्णा अभिषेकही परिवारासह या पार्टीत सहभागी झाला होता. पत्नी कश्मीरा शाह, बहीण आरती सिंह आणि दोन मुलांसह कृष्णा या पार्टीत दिसला. कश्मीरा शाहचा बोल्ड अँड ब्युटिफूल लूक यावेळी दिसून आला
अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पिंक आणि रेड पेहरावात पार्टीत सहभागी झाली होती. तसंच बाबा सिद्दीकींसोबत तिने फोटोही क्लिक केले
एकीकडे शिल्पा बिनधास्त या पार्टीत सहभागी झाली होती तर दुसरीकडे पती राज कुंद्राने मात्र यावेळी माध्यमांशी बोलणं टाळलं. माध्यमांना कोणतीही पोज न देता राज कुंद्रा थेट पार्टीत गेला
सलमान खानची लहान बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्माही पार्टीत सहभागी झाले होते. लाईट ब्लू ड्रेसमध्ये अर्पिता सुंदर दिसत होती. तर आयुषने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि ब्लॅक पँट परिधान केली होती
संजय दत्तचाही कूल अंदाज या पार्टीत दिसून आला. बिनधास्त आणि रोखठोक संजय दत्तचा पेहरावही तितकाच हटके असल्याचं दिसून आलं
बिग बॉस फेम शहनाज गिलही पार्टीत सहभागी झाली होती...सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज हळूहळू नॉर्मल होतेय. या पार्टीत शहनाजचा फ्रेश लूक दिसून आला.