यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री का करतात लग्न?
बी टाऊनमध्ये नवा ट्रेंड
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही ना काही नवा ट्रेंड सुरूच असतो. सध्या लग्नांचा ट्रेंड सुरू आहे. 2018 मध्ये अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. या अगोदर बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर असताना लग्न करणं म्हणजे मोठा गुन्हा समजला जायचा पण आता करिअरच्या शिखरावरच असताना अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत.
अनेक वर्षांनंतर 2018 हे असं वर्ष आहे जेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लग्न केलं आहे. या लग्नांची सुरूवात 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नापासून झाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक कलाकारांनी लग्नाची गोड बातमी दिली. अगदी वर्ष सरताना कॉमेडिअन कपिल शर्मा विवाह बंधनात अडकला.
सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी बिझनेसमन आनंद अहुजासोबत सात फेरे घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर असतानाच लग्नबंधनात अडकली.
या लग्नांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. खास करून सेलिब्रिटींची लग्न ही अतिशय खाजगी स्वरूपात होतात. पण सोनमने आपल्या सगळ्या विधी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.
यानंतर 10 मे रोजी नेहा धुपिया आणि अंगद बेदीने अगदी अचानक लग्न केलं. या दोघांनी अगदी सिक्रेट लग्न केलं. नेहा धुपिया लग्नाच्यावेळी गरोदर असल्याची माहिती समोर आली. आणि नेहाने 18 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
त्यानंतर सगळ्यांच लक्ष वेधून घेणारा विवाह सोहळा संपन्न झाला. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी 14 ते 15 नोव्हेंबर रोजी इटलीत लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी या पद्धतीने लग्न केलं.
दीपिका आणि रणवीर एकमेकांना सहा वर्षे डेट करत होती. 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या सिनेमांमधून दोघांच्या केमिस्ट्रीला खूप पसंत केलं.
दीपवीरच्या पाठोपाठ देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. प्रियंका आणि हॉलिवूड गायक निक जोनस यांच लग्न झालं. जोधपुरमध्ये उम्मेद भवनात या दोघांनी 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या काळात लग्न केलं.
अभिनेत्रींनी लग्नाची भीती वाटत नाही का?
या सगळ्या लग्नांमध्ये खास गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकल्या त्यांच्या करिअरला नुकतीच चांगली सुरूवात झाली आहे. यशाच्या शिखरावर या अभिनेत्री आहेत.
या अगोदर अभिनेत्रींकरता सिनेमांमध्ये काही खास नसे. पुरूष प्रधान संस्कृती या सिनेमांमधून अधोरेखित होत असे. लग्नानंतर अभिनेत्रींना काम मिळणे कठीण होत असे. यामुळे अभिनेत्री करिअर ओसरता ओसरता लग्न करत असे.
पण आता स्थिती बदलत आहे. या अगोदर सिनेमा करताना फिल्ममेकर सर्वात अगोदर हिरोला साइन करत असतं. पण आता सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार त्यातील पात्र ठरवली जातात.
अगोदरच्या काळात हिरोच्या नावावर सिनेमा बनवला जात असे. पण आता काळ बदलला प्रेक्षक कलाकांरापेक्षा कथेला अधिक महत्व देऊ लागले आहे.
आता महिला प्रधान सिनेमे बनवण्याकडे फिल्ममेकरचा अधिक कल दिसतो. त्यामुळे सिनेमातील नायिका देखील महत्वाची झाली आहे. म्हणून अभिनेत्रींना त्यांच्या लग्नाची भीती वाटत नाही.
या लग्न केलेल्या अभिनेत्रींना प्रश्न विचारण्यात आला की, करिअरच्या चांगल्या टप्यावर तुम्ही लग्न केलं. तुम्हाला या गोष्टीची भीती वाटत नाही? त्यावर मिळालेलं उत्तर हे धक्कादायक आणि कौतुकास्पद आहे. लग्न आपल्या जागी आहे आणि करिअर आपल्या जागी आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.