मुंबई : एका वेगळ्या कथानकाचा सिनेमा ३ स्टोरीज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अर्जुन मुखर्जी यांनी केले आहे. मुखर्जी यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.


ही आहे सिनेमाची खासियत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनींगला मसुमेह मखीजा, अभिनेत्री तनिष्टा चौधरीने देखील हजेरी लावली होती. हा सिनेमा ९ मार्चला प्रदर्शित झाला. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमातून रेणुका शहाणे मोठ्या पडद्यावर पुर्नरागमन करत आहे. 


वरुण शर्मा म्हणतो...


वरूण शर्माने सांगितले की, मला खरंच मनापासून हा सिनेमा खूप आवडला. सिनेमात अभिनेत्यांच्या भूमिका रोमांच आणि रहस्य घेऊन येतात. सर्वांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. सिनेमा प्रेक्षकांना बांधून ठेवतो. यात असलेल्या वेगवेगळ्या कथांचा शेवट एकाच वेळी होतो हे पाहणे मजेशीर आहे.


कल्कि कोचलिन म्हणाली...


तर सिनेमाबद्दल कल्कि कोचलिन म्हणाली की, सिनेमात ३ कथा आहेत आणि तिन्हीही कथा एकमेकांपासून अत्यंत वेगळ्या आहेत. जे अत्यंत इंटरेस्टिंग आहे. म्हणून या फक्त ३ कथा नसून खूप साऱ्या कथा आहेत.


 सिनेसृष्टीतील कलाकारांची प्रतिक्रीया


अभिनेता शर्मन जोशी, पुलकीत सम्राट, ऋचा चड्ढा आणि रेणुका शहाणे या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाबद्दल सिनेसृष्टीतील कलाकारांकडून चांगली प्रतिक्रीया मिळाली आहे. सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित सिनेसृष्टीतील कलाकारांनी या कलाकारांनी आपली प्रतिक्रीया दिली.