मुंबई : आयुष्यात पुढच्या क्षणी काय होणार, याची कोणाला कल्पना नसते. कलाकारांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे कितीही वाईट परिस्थितीत ते असले, तरी प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करायचं. याच प्रवासात अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्यांच्या मुलांचं निधन स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. कलाकार आपल्या टॅलेंटने लोकांना हसवतात आणि रडवतात देखील. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यातही अनेक वेदना असतात, हे जाणून घेतल्यावर सहाजिकपणे  कुणाचेही डोळे ओलावतील. अशाचं काही कलाकारांबद्दल आज जाणून घेवू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश राज (Prakash Raj)
साऊथ आणि हिंदी चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांचा 5 वर्षांचा मुलगा पतंग उडवताना एक फूट टेबलवरून पडला, आणि त्यानंतर त्याची तब्येत ढासळू लागली. काही महिन्यांनीच त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. 


कबीर बेदी
कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली. सिद्धार्थ हा मानसिक आजाराचा बळी होता.


गोविंदा
गोविंदाने आपल्या मुलीच्या जन्माच्या 4 महिन्यांनंतरच तिला गमावलं. गोविंदाच्या या दु:खाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.


आशा भोसले
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासमोर त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आशा भोसले यांच्या लग्नापासून त्यांना तीन मुलं झाली. तीनपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला.


अनुराधा पौडवाल
अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन झालं. अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य याचं  किडनीच्या समस्येमुळे निधन झालं.


मेहमूद
ज्येष्ठ अभिनेते मेहमूद यांच्या मुलाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.


राजीव निगम
कॉमेडियन आणि अभिनेता राजीव निगम यांच्या मुलाचं 2020 मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच निधन झालं. राजीव निगमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, 'व्वा काय गिफ्ट मिळालं आहे.'


जगजित सिंग
1990 मध्ये एका अपघातात जगजित सिंग यांनी आपला मुलगा गमावला. त्यानंतर 2009 मध्ये जगजीत सिंग यांच्या मुलीचही निधन झालं.


गिरीश मलिक
संजय दत्तच्या 'तोरबाज' सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मलिकचा 17 वर्षांचा मुलगा मनन याचा होळीच्या दिवशी मृत्यू झाला. वृत्तानुसार, गिरीश मलिक यांचा मुलगा मनन होळी साजरी करून घरी पोहोचला आणि पाचव्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.