मुंबई : चित्रपट म्हटलं की, त्यामध्ये मुख्य भूमिकेत कोण अभिनेता आहे ? असाच पहिला प्रश्न चाहते विचारतात. कारण, कलाकार आणि त्यांच्या अभिनयावर असणारा चाहत्यांचा विश्वास. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यासाठी ही कलाकार मंडळी बऱ्याच गोष्टी पणाला लावतात. शारीरिक स्वास्थ्य त्यापैकीच एक. सलमानपासून आमिरपर्यंत आणि अगदी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यापर्यंत बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांसाठी स्वत:मध्ये मोठे बदल घडवून आणले. (Bollywood Celebs Transformation)


Aamir khan: 'दंगल' चित्रपटासाठी आमिरनं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनवर बराच घर दिला. चित्रपटासाठी त्यानं जितकं वजन वाढवलं, तितकंच कमीसुद्धा केलं. 



Bhumi pednekar: 'दम लगा के हैशा' या चित्रपटासाठी भूमीनं तिचं वजन बरंच वाढवलं होतं. यानंतर तिनं तितक्याच वेगानं वजन कमीही केलं होतं. 



Randeep Hooda: रणदीप हुड्डानं 'सरबजीत' या चित्रपटासाठी जीव ओतून अभिनय केला. बऱ्याच शारीरिक बदलांतून जात त्यानं या भूमिकेला न्याय दिला. 



Vidya balan: विविध भूमिकांमध्ये असणारा सोबर बाज जपण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन ओळखली जाते. पण, तिनं हीच चौकट मोडली, 'डर्टी पिक्चर' या चित्रपटामुळं. चित्रपटातील तिची भूमिका जितकी वेगळी होती, त्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली होती. 



Farhan Akhtar : अभिनेता फरहान अख्तर यानं 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटासाठी एका खेळाडूप्रमाणं शरीरयष्टी कमवली होती. एका धावपटूच्या रुपात दिसण्यासाठी फरहाननं स्वत:मध्ये डोळे दीपवणारं Transformation केलं होतं.