मुंबई : जीवनात एकदातरी आपल्याला हिणावून जाण्याच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. अनेकदा हिणवलं जाणं, आत्मविश्वास कोलमडून टाकणारं असतं. पण, कला जगतामध्ये एक अशी व्यक्ती आहे, ज्यानं या हिणवल्या जाण्यावरही मात करत आज लाखो आणि करोडो मनांवर राज्य करण्यात यश मिळवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती मोठ्या यशाला गवसणी घालत आहे. तर, कोणासाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा स्त्रोत ठरत आहे.


ही व्यक्ती म्हणजे, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा. बऱ्याच चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन करण्यासोबतच रेमो काही Reality Show च्या परीक्षकपदीही दिसला. अनेक नव्या जोमाच्या कलाकारांना त्यानं सातत्यानं प्रेरणा दिली.


अशा या रेमोला आज सर्वजण कौतुकानं पाहत असले तरीही त्याला हिणावलंही गेलं होतं. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यानं कॅप्शनमध्ये याची माहिती दिली.


‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है...’ या गाण्यावर त्यानं रिल शेअर केला. सोबतच कॅप्शनमध्ये लहानपणी आपल्याला सावळ्या वर्णामुळं कायम, काळ्या... म्हणून हिणवलं गेल्याचं त्यानं सांगितलं.


काळ्या म्हणून हिणवलं जात असल्याचं पाहताना रेमोला फार दु:ख होत होतं. पण, तेव्हाच रंग नाही, तर लोकांचं मन कायम महत्त्वाचं असतं... अशी त्याच्या आईनं समजुत काढली. पुढे हेच गाणं रेमोचं सर्वात आवडीचं गाणं ठरलं.


ज्याला रंगावरून हिणवलं गेलं त्याच रेमोनं मोठ्या सकारात्मकतेनं बऱ्याच गोष्टी शिकत, .संघर्ष करत कला जगतामध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित केली. आहे की नाही, हा सेलिब्रिटी खऱ्या अर्थानं ‘बडे दिलवाला’?