Vicky Kaushal Govinda Mera Naam: विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या दोघांनी गेल्या वर्षी लग्न केले होते. हे कपल (couple) बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध कपल पैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने (Acting) लोकांची मनं जिंकलीत व बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. विकी कौशल आगामी 'गोविंदा मेरा नाम' (Govinda Naam Mera) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (promotion) व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान, विकी कौशलने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल (married life) खुलेपणाने सांगितले. कतरिना कैफसोबत लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले हे विक्की कौशलने सांगितले. (Bollywood Couple Vicky Kaushal & Katrina Kaif What changed in his life after marriage govinda mera naam nz)



विकी कौशलच्या लग्नानंतर बदलले आयुष्य!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गोविंदा मेरा नाम' चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये विक्की कौशलला विचारण्यात आले की, लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला? हा प्रश्न ऐकून विकी कौशल आणि कतरिना कैफ आधी हसले, त्यानंतर त्यांनी मजेशीर पद्धतीने उत्तर दिले. विकी म्हणाला- 'मला या ठिकाणी बदल हा शब्द वापरायचा नाही, इथे काही बदलले आहे असे मी म्हणणार नाही. मी म्हणेन की ते विकसित झाले आहे. तिच्या येण्यामुळे माझ्या जीवनात चांगलेच बदल झाले आहेत.


 




विकीने कतरिनाला डॉक्टरांना सांगितले


विकी कौशलने दुसऱ्या एका कार्यक्रमादरम्यान पत्नी कतरिना कैफची स्तुती केली. तेव्हा विकी म्हणाला, 'तुम्हाला माहित नसेल पण माझी पत्नी फिरती डॉक्टर (Doctor) आहे, ती एक वैज्ञानिक देखील आहे, तिला खूप ज्ञान आहे. ती मला प्रत्येक गोष्टीत मदत करते. माझे अन्न आणि पाणी मी योग्य वेळेवर घेतो का? याची खात्री करते...' विकी कौशल आणि कतरिना कैफच्या त्यांच्या लग्नामुळे अनेक चाहत्यांना आनंद झालाय. हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावर ही तितकेच सक्रिय असतात.