मुंबई : फोटोमध्ये एका अतिशय सुंदर महिलेसोबत दोन सुंदर मुली दिसत आहेत. आईने धाकट्या मुलीला मांडीवर घेतलं आहे.  तर मोठी मुलगी तिथे उभी असल्याचं दिसत आहे. दोन्ही बहिणी आता खूप सुंदर दिसतात तसंच या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत आणि त्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. याचबरोबर आई देखील तिच्या काळात खूप मोठी अभिनेत्री होती,  फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्या मुली मोठ्या होऊन खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित तुम्ही आत्तापर्यंत या बहिणींना ओळखलं असेल. आणि जर तुम्ही अजून ओळखलं नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा फोटो आहे काजोलचा, जी 90 मधील टॉप अभिनेत्री होती. त्याचबरोबर तिची धाकटी बहीण तनिषा आईच्या मांडीवर बसली आहे.



काजोलची आई अभिनेत्री तनुजा सिंगल मदर आहे. तिने आपल्या मुलींना एकट्याने वाढवलं ​​आहे. काजोल लहान असतानाच तिचे पालक वेगळे झाले. काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिची आई तनुजाने तिला आणि बहीण तनिषाला एकटीने वाढवलं. काजोलने एका मुलाखतीत सांगितलं होते की, मी नशीबवान आहे की माझे संगोपन खूप चांगलं झाले आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या आईने मला वाढवलं. काजोल 4 वर्षांची होती जेव्हा तिचे पालक वेगळे झाले.