मुंबई : कलाविश्वात अभिनय क्षेत्रात नाव कमावणयासाठी आलेल्या अभिनेता सवी सिद्धू यांची कथा गेले काही दिवस अनेकांचं लक्ष वेधत आहे. एकेकाळी गुलाल, पटियाला हाऊस या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या सवी सिद्धू यांनी अशा काही अडचणींना तोंड दिलं की यामध्ये त्यांना कलाविश्वापासूनच दूर राहावं लागलं. सवी सध्या मुंबईती एका इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम पाहतात. चित्रपटांमध्येच झळकणाऱ्या या व्यक्तीला आज चित्रपट पाहण्याचा विचार मनात आणण्याचाही वेळ नाही आणि तितकी त्यांची आर्थिक परिस्थितीही नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सवी यांची कहाणी जसजशी कलाविश्वात पसरली तसतसं त्यांच्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला. त्यांना मदत केली जावी अशी प्रतिक्रिया चाहत्यांच्या वर्गातूनही व्यक्त करण्यात आली. दिगदर्शक अनुराग कश्यपनेही त्याच्याच चित्रपटासाठी निवड  केलेल्या आणि सध्या अडचणीत असलेल्या या अभिनेत्याविषयी एक ट्विट केलं. चित्रपट जगतात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे काम नाही, ही वस्तूस्थिती अनुरागने त्याच्या ट्विटच्या माध्यमातून मांडली. 


वाचा : 'ब्लॅक फ्रायडे'तील अभिनेत्यावर चौकीदार होण्याची वेळ



'एक अभिनेता म्हणून मी सवी सिद्धू यांचा आदर करतो. आतापर्यंत मी स्वत: त्यांना तिनदा चित्रपटांसाठी निवडलं आहे', असं म्हणत त्याने एका अभिनेत्यासाठीचा आदर व्यक्त केला. मोठ्या सन्मानाने ते जी नोकरी करत आहेत, सन्मानाने जगत आहेत त्याचा मी आदर करतो, ही बाब त्याने ट्विट करत मांडली. अनेक कलाकार जे काम मिळत नाहीत या एका कारणामुपळे व्यसनाधीन जातात, तसं न करता सवी आयुष्य जगत आहेत. यावेळी त्याने कलाकार होण्यारपूर्वीचा संघर्ष काय असतो, हे पटवून देण्यासाठी नवाजुद्दीन सुरक्षा रक्षक होता, शिवाय आपण अशाही काही कलाकारांना भेटलो आहोत जे आधी भेलपुरी विकायचे, रिक्षा चालवायचे हे नमूद केलं. आपण स्वत:सुद्धा लेखकच होतो हेही त्याने यावेळी सांगितलं. 


एखाद्या कलाकाराला फक्त सहानुभूतीपोटी काम देणं हा कलेचा आणि त्या कलाकाराचाही अनादर आहे. सवीच त्यांची स्वत:ची मदत करु शकतात असं म्हणत एका कलाकाराच्या काही मर्यादा त्याने त्याच्या कामाच्या आड येऊ दिली नाही याबद्दल त्यांनी सवी यांची प्रशंसाही केली.