मुंबई : प्रत्येक सेलिब्रिटी हा या न त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. खिलाडी अक्षय कुमारही अशाच सेलिब्रिटींपैकी एक. मॉर्निंग वॉकपासून, व्यायामाच्या प्रकारांपर्यंत प्रत्येक गोष्टीत तो असं काही अफलातून करुन  जातो की चाहते दाद दिल्यावाचून राहत नाहीत. पण, सध्या मात्र तो एका व्हिडिओमुळे सर्वांच्या भुवया उंचावत आहे. कारण, एका दिग्दर्शकासोबत चक्क त्याचा मारामारी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि खिलाडी कुमारच्या मारामारीचा हा व्हिडिओ करण जोहरनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही एक अशी बाब आहे की ज्यामध्ये मीसुद्धा मध्यस्ती करु शकत नाही. अक्षय कुमारनेही सर्वप्रथम हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 


सेलिब्रिटींची ही मारामारी गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. कारण त्यांचा हा व्हि़डिओ चित्रीत करण्याचं काम कतरिनाने केलं आहे. बरं इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या सेलिब्रिटींमध्ये झालेली ही हाणामारी खरीखुरी नाही, तेव्हा चिंता करण्याचं कारण नाही. 




रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना, अक्षय अशी मंडळी एकत्र आली आहेत. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंग आणि अजय देवगन आणि गुलशन ग्रोवरही झळकणार आहे. सेलिब्रिटींची ही गर्दी असणारा हा 'सूर्यवंशी' २७ मार्च २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.