मुंबई : लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निर्माता-दिग्दर्शक anurag kashyap अनुराग कश्यप याच्याविषयीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर डोकं वर काढू लागल्या आहेत. इतकंच नव्हे, तर आता या प्रकरणाला कायद्याचं वळणही मिळताना दिसत आहे. याच प्रकरणात सेलिब्रिटी वर्तुळातून अनेकांनीच अनुरागची पाठराखण केली आहे.  ज्यामध्ये त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी म्हणजेच आरती बजाज आणि कल्की केक्ला यांचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायल घोष हिच्याकडून अनुरागवर करण्यात आलेले आरोप म्हणजे एक घाणेरडा स्टंट असल्याचं आरतीचं ठाम मत आहे. तर, सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या सर्व निराशाजनक घटनांचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नकोस, असं लिहित कल्कीनंही त्याला पाठिंबा दिला आहे. 


'अनुराग, तू खऱ्या अर्थानं रॉ़कस्टार आहेस. महिलांच्या सबलीकरणासाठी तू जसं काम करत आहेस ते सुरुच ठेव. हे साऱं मी आपल्या मुलीच्या बाबतीच पहिल्यांदा पाहिलं आहे. या जगात प्रामाणिकपणा उरलेला नाही', असं आरतीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. इतरांचा द्वेष करण्यात व्यर्थ जाणारी उर्जा रचनात्मकरित्या वापरल्यास हे जग आणखी उत्तम असेल, असं म्हणत तिनं अनुरागवर आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला. 



दुसरीकडे कल्कीनंही अनुरागच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिल्याचं पाहायला मिळालं. 'महिल्यांच्या स्वातंत्र्यासाठी तू तुझ्या चित्रपटांच्या माध्यमातून लढा दिला आहेस. त्यांची अखंडता कायम राखण्यासाठी तू खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यांमध्ये लढला आहेस', असं म्हणत आपण अनुरागच्या आयुष्यात येण्याआधी आणि त्याच्या आयुष्यात आल्यानंतरही याचा अनुभव घेतल्याचं कल्कीनं लिहिलं. घटस्फोटानंतरही अनुरागनं आपल्याला आधार दिल्याचं म्हणत सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या आरोप- प्रत्यारोपांच्या सत्राचा स्वत:वर काहीच परिणाम होऊ देऊ नकोस असं तिनं अनुरागला उद्देशून म्हटलं आहे. 



 


अनुरागच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या या मंडळींच्या प्रतिक्रिया पाहता या अडचणीच्या प्रसंगी ही बाब त्याला दिला देणारी ठरेल यात शंका नाही. दरम्यान, अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर काही गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणानं डोकं वर काढलं होतं. अनुराग कश्यपनं माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचं सांगत पायल घोषनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. याबाबत सांगणं माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षितताही धोक्यात असल्याचं सांगत, तिने मदतीची विनंती केली होती.