मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची....; सेलिब्रिटी पतीला बाहेरच्या बायकांचा नाद, कळताच पत्नीनं अभिनेत्रीलाही चोपलं
आघाडीच्या अभिनेत्रीला लगावली चपराक
मुंबई : सातत्य नसणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रसिद्धी आणि यश. तुमच्या नशिबात आहे तितकं आणि त्यावेळीच तुम्हाला या सर्व गोष्टींचा स्वाद घेता येईल. पण, नशिबाची दारं वेगळ्या दिशेला तोंड करायला गेल्यावर मात्र धाबे दणाणतील यात वाद नाही.
आयुष्यातील अशाच काही चढ- उतारांचा सामना केला हिंदी चित्रपट जगतातील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीनं.
दमदार कथानकांच्या साथीनं या दिग्दर्शकानं प्रेक्षकांना चित्रपटांचा नजराना दिला. पण, त्याच्या खासगी आयुष्यात मात्र आलेलं वादळ त्याला थोपवून धरता आलं नाही.
'सत्या', 'रंगीला', 'सरकार’, 'कंपनी' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा हा दिग्दर्शक म्हणजे राम गोपाल वर्मा.
राम गोपाल वर्माच्या चित्रपटांहूनही त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा जास्त झाली. कारण ठरलं ते म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर याच्याशी असणारे त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध.
आरजीवी आणि उर्मिला यांच्यातील प्रेम बहरत असतानाच वर्माला मात्र तो विवाहित असण्याचा विसर पडला होता. ही बातमी जेव्हा त्याची पत्नी रत्ना हिच्या कानी आली, तेव्हा तिचा संताप इतका अनावर झाला की, तिनं उर्मिलाच्या सणसणीत चपराकच लगावली.
असं म्हटलं जातं की या प्रकरणानंतर राम गोपाल वर्माच्या वैवाहिक नात्यात वादळ आलं, परिणामी रत्ना आणि त्याचा घटस्फोट झाला.
तिथं करिअर वाचवण्यासाठी म्हणून उर्मिलानंही त्याच्याशी असणाऱ्या नात्याला पूर्णविराम दिला आणि या दिग्दर्शकाच्य खासगी आयुष्याचा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला.
उर्मिला आणि रामच्या नात्याविषयी सांगावं तर, या दोघांनी 13 चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. उर्मिलाच्या करिअरला त्यानं खरी लकाकी दिली असंही म्हटलं जातं. एक काळ असा आला जेव्हा उर्मिला राम गोपाल वर्मासोबतच काम करु लागली, ज्यामुळं इतर दिग्दर्शकांनी तिच्यापासून दुरावा पत्करला.
एकिकडे करिअर घडवत असताना उर्मिला एका वैवाहिक नात्यात कटूता मिसळून गेली. सध्या हीच उर्मिला राजकारणात सक्रीय झाली असून आता तिचा उल्लेख मोठ्या मानानं एकेरी न करता त्या उर्मिला मातोंडकर असा केला जातो.
त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चाही अधुनमधून पाहायला मिळते. तिथे आरजीवी मात्र बऱ्याच वादग्रस्त कारणांनी चर्चेत येत असतो.