35 रुपये पगारापासून सुरुवात करणाऱ्या कलाकाराच्या संघर्षातून बरंच शिकण्यासारखं...
कुटुंबाकडे एक वेळी इतकेही पैसे नव्हते, की...
मुंबई : सहसा एखादी व्यक्ती जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा त्या व्यक्तीला मिळालेलं यश जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच त्या व्यक्तीचा संघर्षमय प्रवासही महत्त्वाचा असतो. अशाच काही व्यक्तींमध्ये बॉलिवूडमधील एका अशा चेहऱ्याचा समावेश आहे, ज्यानं पगार स्वरुपात अवघ्या 35 रुपयांपासून सुरुवात केली होती.
हा चेहरा म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी. रोहित शेट्टीनं अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. हल्लीच त्याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपटही प्रदर्शित झाला.
रोहितच्या वाट्याला सध्या यश आलं असलं तरीही संघर्ष त्यालाही चुकलेला नाही.
नुकताच एका मुलाखतीमध्ये त्याने याचा खुलासा केला. हा काळ तेव्हाचा होता जेव्हा त्यानं 35 रुपयांच्या पगारापासून सुरुवात केली होती.
90 च्या दशकात चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यानं करिअरची सुरुवात केली. त्यावेळी त्याला फक्त 35 रुपये मिळत होते.
आर्थिकदृष्ट्या रोहितचं कुटुंब तितकं सक्षम नव्हतं. त्याचे वडील दिग्दर्शक असूनही त्यांना बराच संघर्ष करावा लागत होता.
रोहितच्या कुटुंबाकडे एक वेळी इतकेही पैसे नव्हते, की ते जेवणाचीही सोय करु शकतील. पण, शेवटी हे चित्र बदललं.
2003 मध्ये रोहितने 'जमीन' या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यानं 'गोलमाल' चित्रपटाची सीरिज, 'ऑल द बेस्ट', 'सिंघम', 'सिंबा', 'चेन्नई एक्स्प्रेस' अशा चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आणला.