मुंबई :  बॉलीवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. बॉलीवूडमधली ४ ते ५ बडी नावं तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि त्यांना एनसीबी लवकरच समन्स पाठवू शकते. पण ही ४ ते ५ नावं सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत सत्य सांगतील का? हा प्रश्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणेने तीन कॅटेगरी तयार केल्याची माहिती आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीतल्या २ डझन जणांच्या नावांची यादी आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये ४ ते ५ नावं आहेत, तर दुसऱ्या कॅटेगरीत ७ ते ८ जण आहेत. तिसऱ्या कॅटेगरीमध्ये फिल्म आणि टीव्हीतले १० चेहेरे असल्याचं सांगितलं जात आहे. 


चित्रपट सृष्टीतल्या या चेहऱ्यांमध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह अनेक नावं आहेत. ही सगळी नावं एनसीबीच्या रडारवर आहेत. एनसीबीच्या हातात काही धागेदोरे आले आहेत, त्यामुळे एनसीबी या चेहऱ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एनसीबीला काही पुरावे मिळाले आहेत, ज्यात ड्रग्ज कनेक्शनच्या गोष्टी समोर येत आहेत, अशी माहिती आहे.


तपास यंत्रणा या सेलिब्रिटींविरुद्ध आणखी पुरावे गोळा करत आहे, कारण जेव्हा त्यांना चौकशीला बोलावण्यात येईल तेव्हा आपली बाजू आणखी मजबूत पद्धतीने मांडता येईल.