मुंबई : राधे माँला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. जगभरात तिला लाखो लोकं फॉलो करतात. पण फार कमी लोकांना माहित आहे की, राधे माँला एक मुलगा देखील आहे. जो काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे. ड्रीम गर्ल आणि आई एम बन्नी सारख्या चित्रपटात तो दिसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधे माँच्या मुलाचं नाव हरजिंदर सिंग आहे.  'इन्स्पेक्टर अविनाश' ही आगामी वेब सीरिज आहे. ज्यामध्ये तो रणदीप हुड्डासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिरीजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हापासून लोकांना याची माहिती मिळाली तेव्हापासून ते हरजिंदरला वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंग याने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत सांगितलं की, त्याला लहानपणापासूनच क्रिकेटर किंवा अभिनेता बनायचं होतं. तो म्हणाला, "मला फक्त दोनच छंद होते. एकतर मला क्रिकेटर व्हायचं होतं किंवा दुसरं अभिनेता व्हायचं होतं. मला जेवढं माहित आहे की, क्रिकेटरचे वय असते. एक काळ असा होता की अभिनयाचेही वय होते. पण आता तसं नाही.


आता तुम्ही कधीही कॅमेऱ्यासमोर येऊ शकता. फक्त तरुण पात्र करू शकत नाही. मी एमआयटी पुणे येथून शिक्षण घेतलं आहे. तिथे जे काही कार्यक्रम व्हायचे, त्यात मी गुंतून जायचो. तिथून हळू हळू पुन्हा लिंक निघाली. मला हे देखील समजलं की स्टेजवर राहिल्याने मला आनंद मिळतो."



दुसरीकडे, रणदीप हुड्डासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल हरजिंदर म्हणाला, "त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. एक अभिनेता म्हणून मला तो खूप आवडतो. मी लखनऊच्या शूटिंगमध्ये त्याला सांगितलं होतं की, मी फक्त त्यांच्यामुळेच चित्रपट पाहायला गेलो आहे."