मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे आणि ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्रने महत्त्वपूर्ण विधान केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या जमान्यात सिनेमा उद्योग हा भाजी मार्केट झाला आहे, कलाकार पैशांसाठी काहीही करायला तयार असतात असे विधान त्यांनी केले आहे.


'आजतक अजेंडा २०१७' या कार्यक्रमात ते बोलत होते. 


'आमच्या काळात असे नव्हते'


आजची फिल्मी दुनियाही त्यांच्या दुनियेपेक्षा खूप वेगळी असल्याचे धर्मेंद्र यांनी सांगितले. ' सिनेमा हे असे क्षेत्र बनले आहे जिथे तुम्ही खूप प्रकारच्या भाज्या विकू शकता, खरेजी करू शकता आणि सौदेबाजीही करू शकता. इथे पैसा ही आहे.  परंतु आमच्या काळात असे नव्हते.' असे त्यांनी सांगितले.


'फिल्मफेअरशी देणघेण नाही'


धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ३०० चित्रपट केले आहेत. कोणताही पुरस्कार न मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार मिळू  न शकल्याचे कोणते शल्य आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले. मी हा अॅवॉर्डदेखील दिलीप कुमार साहेबांमूळे घ्यायला गेलो. कारण हा पुरस्कार मला त्यांच्याहस्ते मिळणार आहे.


ते 'हुशारपण' माझ्याकडे नाही


मला फिल्मफेअरशी काही देणंघेण नाही, या इंडस्ट्रीतून तुम्हाला अॅवॉर्ड घेता आला पाहिजे. मला ते 'हुशारपण' माझ्याकडे नाही. हा पुरस्कार मिळविण्यासाठी लोक खूप मार्ग अवलंबतात असेही ते म्हणाले. 


'यमला पगला दिवाना ३'


'यमला पगला दिवाना ३' हा धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा येत्या वर्षात रिलीज होणार आहे.