मुंबई : कन्नड चित्रपट अभिनेत्री रचिता राम हिला 'डिंपल क्वीन' म्हणून ओळखलं जातं. रचिता सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिचा आगामी  सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान ती 'लव यू रच्चू' असं काहीसं बोलून गेली ज्याच्यावर इंडस्ट्रीत बंदी घालण्याची मागणी होत आहे. या वक्तव्यानंतर कन्नड क्रांती दलाने रचिता रामला जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने त्यांच्यावर बंदी घालण्याचा विचार करावा, असं कन्नड क्रांती दलानं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानावरून वाद
पत्रकार परिषदेत चित्रपटाशी संबंधित एका प्रश्नावर तिने 'सुहागरात'बद्दल आपलं मत लोकांसमोर ठेवलं. त्यानंतर हा सगळा वाद निर्माण झाला. पत्रकार परिषदेत पत्रकाराने रचिताला तिच्या 'लव यू रच्चू'  चित्रपटातील बोल्ड सीनवर प्रश्न विचारला. स्क्रिप्टची ही मागणी असल्याचं रचिता म्हणाली. ती पुढे म्हणाली, 'इथे लग्न झालेले बरेच लोक आहेत. मला कोणाला लाजवायचं नाही.


रचिता पुढे म्हणाली, 'मी तुम्हाला विचारते की लग्नानंतर लोक काय करतात? ते सेक्स करतात ना? बरं, चित्रपटातही तेच दाखवलं आहे. हे सीन्स मी काही कारणास्तव केले. हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. मात्र, रचिताचे चाहते तिच्या या बोल्ड वक्तव्याचं समर्थन करत आहेत.


दुसरीकडे कन्नड क्रांती दलाचे अध्यक्ष तेजस्वी नागलिंगस्वामी म्हणतात की, हे आपल्या चित्रपट उद्योगाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यांनी कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सकडे रचिताच्या बोल्ड सीनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, असं न केल्यास 'लव्ह यू रछू' कर्नाटकात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रकरण न्यायालयात नेणार असल्याची धमकीही त्यांनी दिली आहे.