Kareena Kapoor Birthday: करीना कपूर आणि शाहीद कपूर ही जोडी जब वी मेटच्या (Kareena Kapoor and Shahid Kapoor in Jab We Met) वेळेस खूपच गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप गाजल्या होत्या. शाहीद आणि करिना लवकरच लग्न करतील अशी आशाही त्यांच्या चाहत्यांना होती परंतु त्यांच्या ब्रेकअपमुळे (Kareena Kapoor and Shahid Kapoor Breakup) अनेकांच्या पदरी निराशाच आली. आज करीनाचा 42 वा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं हा एक थ्रॉबॅक व्हिडीओ (Kareena Kapoor Throwback Video) सध्या व्हायरल होत आहे. (bollywood kareena kapoor kissed Ex Boyfriend shahid in front of saif ali khan after receiving an award video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीद आणि करीना अनेकदा बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे, अगदी पुरस्कार सोहळ्यांमध्येही ही जोडी अनेकदा एकमेकांच्या बाजूला बसलेली तुम्हाला दिसली असेल. तुम्ही एकेकाळी जर शाहीद कपूर आणि करीना कपूरच्या लव्ह स्टोरीचं फॅन असाल तर तुम्हाला हा किस्सा नक्की आठवत असेल. 2006 साली आलेल्या हिंदी चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी 2007 साली फिल्मफेअर पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शाहीद आणि करीना एकमेकांना डेट करत होते. 


परंतु काही काळानं त्यांचं ब्रेकअप झालं आणि करीनाच्या आयुष्यात सैफ अली खानची (Kareena Kapoor and Saif Ali Khan) एन्ट्री झाली. खरं म्हणजे 2007 साली संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला सैफ अली खान (Saif ali Khan), करीना कपूर आणि शाहीद कपूर एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर एकमेकांना फारसे ओळखत नव्हते. 



सैफला ओमकारा (Omkara) या चित्रपटासाठी पुरस्कार प्राप्त झाला होता तेव्हाच करीनालाही त्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्यावर करीनाचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती बाजूला बसलेल्या शाहीद कपूरला किस करते आणि पुरस्कार स्विकारते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.