मुंबई : आपल्याला माहितच आहे खिलाडी अक्षय कुमार मराठी सिनेमांचा चाहता आहे. स्वानंद किरकिरे यांच्या 'चुंबक' हा मराठी सिनेमा प्रोड्यूस केला आहे. आपल्याला माहित आहे की, या सिनेमातून गीतकार स्वानंद किरकिरेने अभिनयात पदार्पण केलं आहे. अक्षय कुमारने या सिनेमाचं भरपूर कौतुक केलं होतं. तसेच अक्षय मराठी सिनेमांच देखील कौतुक केलं होतं. आता अक्षयने आणखी एका मराठी दिग्दर्शकांची भेट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


फ्रान्समध्ये होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून 'पळशीची पी.टी.' या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. हा सिनेमा मुळचा साता-याचा म्हणजेच साता-यातील पळशी गावातला आहे. 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यामुळे 'पळशीची पी.टी.' चे कौतुक संपूर्ण साता-यात होत होते आणि योगायोगाने त्याच दरम्यान साता-यामध्ये अभिनेते अक्षय कुमार त्यांच्या आगामी हिंदी 'केसरी' चित्रपटाचे शूट करत होते. 'पळशीची पी.टी.' चे कौतुक त्यांच्याही कानावर पडले आणि कुतुहल म्हणून काय आहे 'पळशीची पी.टी.' हे जाणून घेण्यासाठी अक्षय कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांना 'केसरी'च्या सेटवर बोलवून त्यांची भेट घेतली. 



या भेटीनंतर 'पळशीची पी.टी.' ची कथा आणि सर्वांनी मिळून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून कसं तयार केलं, त्यासाठी घेतलेली मेहनत जाणून घेतल्यावर अक्षय कुमार यांनी देखील 'पळशीची पी.टी.'चे मनापासून कौतुक केले आणि चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.