मोठ्या पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी बनला `गे`, शाहरुख खानच्या 35 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा Video
Entertainment : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचे देशातच नाही तर जगभरात करोडो चाहते आहेत. त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल, त्याची सिग्नेचर स्टेप चाहत्यांकडून कॉपी केल जाते. पण आजही अशा काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांना माहित नाहीत.
Entertainment : देशातला सर्वात मोठा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) वयाच्या पन्नशीनंतरही बॉलिवूड (Bollywood) राज्य करतोय. गेली अनेक वर्ष शाहरुख खानने अनेक सुपर हिट चित्रपट दिले. देशातच नाही तर जगभरात शाहरुखचे करोडो चाहते आहेत. आजही त्याच्या चित्रपटांना थिएटरमध्ये तुफान गर्दी होते. गेल्या वर्षी शाहरुख खानने दोन रेकॉर्डतोड ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. पठाण आणि जवान चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. पण तुम्हाला माहित आहे का मोठ्या पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी शाहरुखला संघर्ष करावा लागला.
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दीवार' या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून शाहरुखने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याआधी काही चित्रपटात त्याने छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत. सुरुवातीच्या काळातील शाहरुखच्या यापैकीच एका चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'गे' कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका
किंग खान शाहरुखबाबत आजही अशा काही गोष्टी आहेत, ज्या चाहत्यांना माहित नाहीत. शाहरुख खानने एका चित्रपटात चक्क गे कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
त्या चित्रपटाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 1989 मध्ये आलेला इंग्रजी टीव्ही चित्रपट 'In Which Annie Gives It Those Ones' चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका कॉलेज विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुख प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन रैना आणि अभिनेत्री अरुंधती रॉय यांचा सीनिअर दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शाहरुखचं पात्र हे 'गे' आहे.
'In Which Annie Gives It Those Ones' चित्रपटाची लेखिका प्रसिद्ध अरुंधती रॉय आहे आणि या चित्रपटात तीने भूमिकाही साकारली आहे. अरुंधती रॉय यांचे पती प्रदीप किशोर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर रोशन सेठ, ऋतुराज सिंह आणि मनोज वाजपेयी या कलाकारांनीही सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ही सर्व नावं आता फिल्म इंडस्ट्रीतली मोठी नावं आहेत.
या चित्रपटाआधी शाहरुखने फौजी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेशिवाय शाहरुखनने 'उम्मीद', 'वागले की दुनिया', 'दिल दरिया' 'महान कर्ज' आणि 'इडियट' सारख्या मालिकेतूनही छोट्या भूमिका केल्या होत्या. 'सर्कस' या टीव्ही मालिकेने शाहरुख खाननला प्रसिद्धी दिली. त्यानतंर त्याला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.
शाहरुखने स्विकारलं आव्हान
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच शाहरुख खानने आव्हानात्मक भूमिका स्विकारली. 90च्या दशकात समलैंगिक विषयांवर चित्रपट काढणं आणि त्यात भूमिका साकरणं या आव्हानात्क गोष्टी मानल्या जात होत्या. गे कॉलेज विद्यार्थ्याच्या भूमिकेनंतर शाहरुखने कल्पना लाजमी यांचा दरमियां (1997) या चित्रपटात तृतीयपंथीची भूमिका साकारण्यासाठीही उत्सुकता दाखवली होती. यासाठी शाहरुखने कल्पना लाजमी यांना फोनही केला होता.