KRK Life In Danger : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) उर्फ KRK ला नुकताच एका प्रकरणात जामीन मिळाला. याचदरम्यान केआरकेचा मुलगा फैझल कमालने (Faisal Kamal) आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. 'काही जणं माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत असल्याचा' दावा फैजलने केला आहे. फैझलने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या वडिलांना वाचवा - फैझल कमाल
फैझलने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, मी केआरकेचा मुलगा फैझल कमाल... 'मुंबईत काही जण माझ्या वडिलांना जीवे मारण्यासाठी त्यांचा छळ करत आहेत. मी 23 वर्षांचा असून मी शिक्षणासाठी लंडनला रहातो. त्यामुळे मी खूप चिंतीत आहे. मला कळत नाहीए मी त्यांची मदत कशी करु. मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांचा जीव वाचवण्याची विनंती करतो'.



सुशांतसिंह राजपूत सारखं... 
फैझल कमालने आणखी एक ट्विट केलं असून त्यात त्याने म्हटलंय... 'वडिलांशिवाय मी आणि माझी बहिण जगू शकत नाही. त्यांचं आयुष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या वडिलांचा सुशांत सिंग राजपूतप्रमाणे (Sushant Singh Rajput) मृत्यू व्हावा अशी आमची इच्छा नाही. मी देशातील जनतेला विनंती करतो की, माझ्या वडिलांच्या आरोग्यासाठी मला पाठिंबा द्या'



वादग्रस्त ट्विटमध्ये केआरकेला अटक
केआरकेला 30 ऑगस्टला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला मालाड पोलिसांनी अटक केली. एका प्रकरणात 2020 मध्ये राहुल कनाल यांनी केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात केआरकेला जामीन मिळाला.


चार दिवसांनी पुन्हा अटक
त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे 3 सप्टेंबरला केआरकेला पुन्हा अटक करण्यात आली. 2021 मध्ये एका फिटनेस ट्रेनचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पाच दिवसांच्या तुरुंगवारीनंतर केआरकेला 8 सप्टेंबरला जामीन मिळाला.