लग्नाच्या आधीच सगळं...; मध्यरात्री मलायका-अर्जुन स्पॉट झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल
नुकतेच ते दोघं मध्यरात्री एअरपोर्टवर स्पॉट झाले.
Malaika and Arjun Kapoor: सध्या बॉलीवूडमधलं हॉट कपल म्हणजे अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora). त्या दोघांची केमस्ट्री सगळ्यांनाच आवडते. अर्जूननं मलायकासोबतच्या आपल्या नात्याबद्दल अनेकादा खुलासे केले आहेत. मलायका मात्र अर्जून आणि तिच्या रिलेशनशिपवर फार काही बोलताना दिसत नाही. अर्जून आणि मलायका अनेकदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्याच्या नात्याबद्दल आता काहीच लपून राहिलेले नाही. (bollywood love birds malaika arora and arjun kapoor spotted at airport late night netizens trolled)
नुकतेच ते दोघं मध्यरात्री एअरपोर्टवर स्पॉट झाले. तेव्हा मलायका नाईट सूटमध्ये दिसली आणि तिच्या हातात शाल होती. तसेच अर्जून कपूर गाडीत बसला होता. ते दोघं लेट नाईट स्पॉट झाल्यानें नक्की हे दोघं कुठे जातायत म्हणून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. मलायकानं हातात शाल घेतल्यामुळे तिलाही अनेकांनी ट्रोल केले आहे. विमानात चादर मिळते घेऊन जायची काही गरज नाही अशा भाषेतही काहींनी तिला ट्रोल केले. तर लग्नानंतरही असं बॉयफ्रेंडसोबत फिरणं हे फक्त बॉलीवूडमध्येच होऊ शकत अशा प्रकारेही कमेंट्समधून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
एका युझरने तर असं लिहिले आहे की तुम्हाला एवढंच फिरायची हौस आहे रात्रीअपरात्री तर मग लग्नच करा, लग्नाच्या आधीच सगळं? असं म्हणतही अर्जून आणि मलायकावर सणाणून टिका केली आहे.
अर्जून आणि मलायका कुठेतरी लांबच्या टूरला एकटे फिरायला गेले असावेत असा अंदाज लावला जात आहे. अर्जून कपूर हा लवकरच त्याच्या आगामी 'द लेडी किलर' (The Lady Killer) या चित्रपटातून दिसणार आहे. ज्यात त्याच्यासोबत भुमी पेडणेकरही असेल तसेच तब्बूसोबत त्याचा 'कुत्ते' (Kuttey) हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.