मुंबई : आई ही आपले विश्‍व, आधारस्‍तंभ व पहिली जिवलग मैत्रिण आहे. ती आपल्‍याला प्रोत्‍साहन देते, मार्गदर्शन करते, आपल्‍याला मार्ग दाखवते आणि उंच भरारी मारण्‍यास प्रेरित करते. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे ती नेहमीच आपल्‍या पाठीशी असते. यंदा मातृ दिनानिमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार आणि वास्‍तविक जीवनामध्‍ये माता असलेल्‍या हिमानी शिवपुरी (मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील कटोरी अम्‍मा), शुभांगी अत्रे (मालिका 'भाबीजी घर पर है'मधील अंगूरी भाभी) आणि फरहाना फतेमा (मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील शांती मिश्रा) त्‍यांच्‍या मुलांसोबतच्‍या खास नात्‍याबाबत सांगत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ''माझा मुलगा माझे सर्वस्‍व आहे. आम्‍ही एका टीमसारखे आहोत. आमच्‍यामधील नाते अद्वितीय व अत्‍यंत खास आहे. मी मुंबईला आले आणि माझा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर माझ्या पतीचे निधन झाले. अशा आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये माझा मुलगा कट्यायन माझ्यासाठी प्रबळ आधारस्‍तंभ होता. त्‍याने माझ्याकडे पाहिले आणि म्‍हणाला 'आई, मला तुझ्यासोबत मुंबईला यायचे आहे'.


मला आजही माझ्यासाठी त्‍याच्‍या डोळ्यामध्‍ये दिसलेली निरागसता व काळजी आठवते. तो मला विश्‍वाच्‍या अव्‍वलस्‍थानी असल्‍याची भावना देतो. मातृत्‍वाचा अनुभव अद्भुत राहिला आहे. तो माझ्या जीवनातील प्रत्‍येक चढ-उतारामध्‍ये सोबत राहिला आहे. प्रत्‍येक दिवस त्‍याच्‍यासोबत खूप खास असतो आणि यामुळे माझे जीवन आनंदमय झाले आहे. एकटी कमावती माता असणे खूपच आव्‍हानात्‍मक आहे, पण माझ्या मुलाने प्रत्‍येक टप्‍प्‍यावर पाठिंबा दिल्‍यामुळे मी हा प्रवास यशस्‍वीपणे पार करू शकले. तो अत्‍यंत समंजस व सहाय्यक आहे. मला त्‍याच्‍यासारखा मुलगा असल्‍यामुळे धन्‍य वाटते. मातृ दिनानिमित्त माझी इच्‍छा आहे की, सर्व एकट्या असलेल्‍या मातांना प्रचंड शक्‍ती व धैर्य मिळो. हे सोपे नाही, पण आपल्‍या मुलांना चांगले व्‍यक्‍ती बनताना पाहून मन आनंदाने भरून येते.


एकट्या असलेल्‍या माता या आपल्‍या मुलांना आनंदी ठेवण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या सर्व गरजा पूर्ण करण्‍यासाठी महिलांना कराव्‍या लागणा-या त्‍यागाच्‍या परिपूर्ण आदर्श आहेत. त्‍यांचा उत्‍साह व धैर्याला सलाम!'' शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्‍हणाल्‍या, ''मी या क्षेत्रामध्‍ये प्रवेश करत असताना एकटी नव्‍हते. माझे पती माझ्या सोबत होते. तसेच, माझी दोन वर्षांची मुलगी आशी होती आणि करिअर सुरू करण्‍यासाठी तिला एकटीला घरात सोडणे अशा द्विधा मन:स्थितीमध्‍ये होते. माझ्या करिअरची सुरूवातीची काही वर्षे खूपच अवघड होती. पण माझ्या कुटुंबाने मला आधार दिला. मी १५ दिवसांसाठी बाहेर शूटिंगसाठी जायचे तेव्‍हा माझी मुलगी माझ्याशिवाय कशी राहील याची चिंता करावी लागायची नाही. ती अत्‍यंत समजूतदार मुलगी आहे आणि मला खास वाटण्‍यासाठी सर्वकाही करते.


आम्‍ही दोघी एकत्र आई-मुलीच्‍या नात्‍याचा खूप आनंद घेतो. आम्‍ही एकत्र घरातील कामे करतो, इनडोअर गेम्‍स खेळतो आणि एकत्र बोलतो, हसतो. यामध्‍ये एकजूटता महत्त्वाची आहे आणि आमचे नाते अत्यंत खास आहे. सर्व मातांना ते घेत असलेल्‍या मेहनतीसाठी मातृ दिनाच्‍या आनंदमय शुभेच्‍छा! प्रत्‍येक आई तिच्‍यापरीने अद्वितीय असते. तुम्‍ही करत असलेले त्‍याग आणि प्रेमासाठी तुम्‍हाला माझा सलाम!'' फरहाना फतेमा ऊर्फ शांती मिश्रा म्‍हणाल्‍या, ''माझे माझी १० वर्षाची मुलगी मैसरासोबत दृढ नाते आहे. ती माझे विश्‍व, सर्वकाही असण्‍यासोबत माझ्यासाठी अमूल्य आहे. माझी नेहमीच एक मुलगी असण्‍याची इच्‍छा होती आणि माझी ती इच्‍छा पूर्ण झाली आहे. व्‍यक्‍ती म्‍हणून ती खूपच मायाळू असण्‍यासोबत प्रेमळ व काळजी घेणारी आहे. कधी-कधी ती माझ्याशी मुलीपेक्षा आईप्रमाणेच वागते. ती माझ्या जीवनात खूप आनंद व उत्‍साह आणते. मी उदास असल्‍यास मला उत्‍साहित करते, आजारी असताना माझी काळजी घेते.


आम्‍ही दोघी एकमेकींना प्रत्‍येक गोष्‍ट सांगतो. आम्‍ही अधिककरून मैत्रिणी आहोत आणि सर्वकाही एकमेकींना सांगतो. आमचा एकमेकींवर खूप विश्‍वास आहे, ज्‍यामुळे आमच्‍यामधील नाते अद्वितीय आहे. मला मैसराबाबत एकच गोष्‍ट पटत नाही आणि मी तिच्‍यावर रागावते, ती म्‍हणजे ऑनलाइन गेम्‍सप्रती तिची आवड. म्‍हणून कधी-कधी आमच्‍यामध्‍ये भांडण देखील होतात. पण थोडीफार तूतू-मैंमैं आई-मुलीमध्‍ये असतेच, हो ना? माझ्याकडून सर्व अद्वितीय व अद्भुत मातांना मातृ दिनाच्‍या खूप-खूप शुभेच्‍छा!''