मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या बऱ्याच अडचणींतून पुढे जात आहेत. शाहरुखच्या मुलाला काही दिवसांपूर्वी एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं. त्या दिवसापासून आर्यन कोठडीत आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीतही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ज्यामुळं शाहरुख आणि त्याच्या कुटुंबापुढं आता आर्यनला नेमकं या साऱ्यातून बाहेर कसं काढायचं हाच प्रश्न उभा राहिला आहे. (Shah Rukh Khan, Aryan Khan, NCB, DDLJ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे मुलगा संकटात असताना शाहरुखसाठी एक आनंदाची बातमी असल्याचं कळत आहे. ही बातमी आहे त्याच्या चित्रपट कारकिर्दीशी निगडीत. शाहरुख आणि काजोल यांच्या भूमिका असणाऱ्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला तब्बल 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच कोरोनाच्या संकटानंतर 22 ऑक्चोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरु होत आहेत. असं असलं तरीही मराठा मंदिरामधून 'डीडीएलजे'चे शो बंद करण्यात येतील याचीच चिंता चाहत्यांना होती. 


मुळात तसं नाहीये, कारण मराठा मंदिरमध्ये किंग खान आणि कोजलच्याया चित्रपटाचं स्क्रीनिंग सुरुच असणार आहे. 


कोरोना संकटामुळं सर्वच सिनेमागृहांप्रमाणे मराठा मंदिरचंही मोठं नुकसान झालं. पण हे सारं विसरत शाहरुख आणि काजोलच्या या कलाकृतीला दाद देत प्रेक्षकांपुढे हा नजराणा आणण्याचं सत्र मात्र कायम राखलं जाणार आहे. शाहरुख आणि काजोलसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. 


चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतकी वर्षे उलटूनही प्रेक्षकांची त्याला मिळणारी पसंती आणि प्रेम पाहता, कलाकारांसाठी ही त्यांच्या कामाची मोठी पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही.