मुंबई : कलाकारांशी प्रेक्षकांचं अतिशय जीवाभावाचं आणि आपलेपणाचं नातं असतं. अनेकदा याचीच प्रचितीही येते. अशाच या वातावरणात सध्या एका कलाकारानं त्याचा फोटो शेअर केल्यामुळं चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चाहत्यांना चिंता वाटण्याचं कारण म्हणजे अभिनेत्यानं साधासुधा नव्हे, तर थेट रुग्णालयातून पोस्ट केलेला फोटो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जोधा अकबर' या चित्रपटातून काम करत लोकप्रिय झालेला हा अभिनेता आहे रजत टोकस. 'धरती का वीर पुत्र: पृथ्वीराज चौहान'मधूनही तो झळकला होता.


रजतनं एकाएकी रुग्णालयातून त्यचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याला या अवस्थेत पाहून अनेकांचीच चिंता वाढली. 


फोटो शेअर करत रजतनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जीवनात तणाव कायमच असेल. प्रत्येक वेळी तुमच्याकडे पर्याय असतो की तुम्ही यावर कसे व्यक्त व्हाल. नाहीतर शरीर व्यक्त होण्यास सुरुवात करतं'. 


रजतनं या कॅप्शनमधून आपल्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट केलं. शिवाय काही गंभीर बाबही नसल्याचं त्यानं सांगितलं. 


आपण लवकरच पूर्णपणे बरे होऊ, अशी आशा त्यानं या कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 


रजतची ही पोस्ट वाचल्यानंतर तो नैराश्याचा सामना तर करत नाही, ना असं म्हणत चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. 




रजतच्या कामांबद्दल सांगावं तर, 2019 पासून तो अभिनय विश्वापासून काही अंशी दूर आहे. ज्यामुळं त्याच्या कमबॅकचीही चाहते प्रतिक्षा करत आहेत.