मुंबई : 'पंगा' Panga म्हटलं की कोणा एका गोष्टीसाठी पेटून उठत ती गोष्ट मिळवण्यासाठीचे आक्रमक प्रयत्न किंवा एक प्रकारचा वाद, अशी व्याख्या आपल्यासमोर उभी राहते. बॉलिवूड अभिनेत्री Kangana Ranaut कंगना रानौत सध्या असाच पंगा घेताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल, पंगा काही कंगनाला  नवा नाही. बरं त्यामागची कारणंही नव्याने सांगायला नको. सध्या बी- टाऊनच्या याच 'क्वीन'ने पुन्हा एकदा पंगा घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने घेतलेला हा 'पंगा' अनेकांना नव़ा आशेचा किरण देणारा ठरत आहे. यावेळी त्यासाठीचं निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिचा आगामी चित्रपट. अश्विनी अय्यर तिवारीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'पंगा' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कंगनाने मध्यमवयीन विवाहितेची भूमिका साकारली आहे. जी नोकरी, घर, कुटुंब, मुलगा, पती अशा प्रत्येकांसाठी तिच्या आयुष्यातील जवळपास सर्वच क्षण खर्ची घालत असते. 


मुळात तिचीही काही स्वप्न असतात. ही स्वप्न असतात, कबड्डी या खेळाबद्दलची. मुळची कबड्डीपटू असणारी 'जया', वैवाहिक जीवनानंतर कशा प्रकारे स्वत:ला इतर काही जबाबदाऱ्यांणध्ये बांधून घेते आणि तिची स्वप्न कशा प्रकारे दूरावतात याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. मुळात स्वप्न दुरावली असली तरीही त्यांच्यामागे धावण्याची जिद्द मात्र अद्यापही कायम असल्यामुळे वयाच्या ३२व्या वर्षी ही जया राष्ट्रीय कबड्डी संघात स्वत:चं स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांत झोकून देते. तिची हीच जिद्दीची गाथा या चित्रपटातून पाहता येणार आहे. 



एक पत्नी, आई, मुलगी आणि मैत्रीण म्हणून कंगनाने तिच्या वाट्याला आलेली भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येता आहे. जेसी गिल या चित्रपटातून तिच्या पतीच्या तर, अभिनेत्री नीना गुप्ता या तिच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहेत. तेव्हा आता आयुष्याच्या या वाटेवर नव्याने सुरुवात करु पाहणाऱ्या, कंगनाने साकारलेली जयाची प्रेक्षकांवर किती छाप पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 


'तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे


मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिल्यांना काही गैरसमजुतींमुळे त्यांच्या स्वप्नांना आवरतं घ्यावं लागतं. हाच समज मो़डीत काढणारा हा 'पंगा' २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.