मुंबई : वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणारा Street Dancer 3D  'स्ट्रीट डान्सर ३डी' या चित्रपटाने अभिनेत्री kangana ranaut कंगना रानौतच्या 'पंगा' panga या चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर प्रवेश केला. कंगनाचा दमदार अभिनय, अश्विनी अय्यर तिवारी याची जोड असतानाही 'पंगा' मात्र सुरुवातीलाच मंदावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुणच्या 'स्ट्रीट डान्सर ३डी'च्या कमाईने चांगलाच वेग पकडला. अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या कमाईची गाडी सुस्साट असतानाच वरुण आणि श्रद्धाची अदाकारी असणाऱ्या स्ट्रीट डान्सरनेही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. 


प्रजासत्ताक दिन आणि त्यापूर्वीचे आठवड्या अखेरचे दोन दिवस, त्यातच असणारी सुट्टी याचा फायदा रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटाला झाला. रविवारी या चित्रपटाने १७.७६ कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामुळे एकूण गल्ला ४१.२३ कोटींवर पोहोचला. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याविषयीची माहिती दिली. 




कंगना रानौत मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'पंगा'ला मात्र सुट्टीचा फायदा घेता आला नाही. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या रविवारी या चित्रपटाने ६.६० कोटी रुपये इतकी कमाई केली. ज्यामुळे आतापर्यंत एकूण कमाईचे आकडे हे अवघ्या १४.९२ कोटींवरच पोहोचू शकले आहेत. कंगनाच्या या चित्रपटाला चांगलं यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, पहिल्या दिवशी या चित्रपटाला अपेक्षेहूनही कमी कमाईच्या आकड्यांना सामेरं जावं लागलं. 


वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप


कंगना आणि वरुण धवन स्टारर या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर त्यांची यशाची वाट शोधण्यास अपयश येत असतानाच 'तान्हाजी' यामध्ये खऱ्या अर्थाने Unstoppable आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.