आधी किस मग काम, `या` संगीतकारावर लैंगिक शोषणाचा आरोप
`तरुण मुलींनी या संगीतकारापासून सावध रहावं`
मुंबई: गायिका सोना मोहापात्रा हिने काही दिवसांपूर्वी कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, ज्यानंतर संगीत विश्वातील आणखी एका व्यक्तीचं नाव या यादीत समाविष्ठ झालं आहे.
लैंगिक शोषण करण्यात आलेल्या या व्यक्तीचं नाव आहे, संगीतकार- गायक अनू मलिक.
गायिका श्वेता पंडीत हिने एका ट्विटर पोस्टच्या माध्यमातून आपला #MeToo चा अनुभव सर्वांपर्यंत आणला आहे.
काम देण्याच्या बदल्यात अनू मलिक यांनी कशा प्रकारे आपल्याकडे किसची मागणी केली होती, याविषयी तिने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी तिला या वाईट अनुभवाचा सामना करावा लागला होता.
सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने तरुण मुलींनी अनू मलिक यांच्यापासून सावध रहावं, असा इशाराही दिला आहे. अनू मलिक आता तुमची वेळ संपली.... असं म्हणत तिने थेट शब्दांमध्ये त्यांच्यावर आरोप केले आहेत.
श्वेताने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
2000 मध्ये ती प्रकाशझोतात आली. ज्यानंतर तिची बरीच गाणी लोकप्रिय झाली. त्याच बळावर तिला काही ऑफर्सही येऊ लागल्या. एक दिवस तिला अनू मलिक यांच्या मॅनेजरने फोन करुन गाण्याची ऑफर दिली.
गाण्यासाठी म्हणून तिला एंपायर स्टुडिओ येथे बोलावण्यात आलं. ती तिच्या आईसोबत त्या ठिकाणी आली.
त्यावेळी अनू मलिक 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड करत होते.
अनू मलिक यांनी श्वेताला एका छोट्या केबिनमध्ये थांबण्यास सांगितलं. कोणत्याही वाद्याच्या साथीशिवाय त्यांनी तिला गाण्यास सांगितलं. तिची गायनशैली मलिक यांना आवडलं.
या पोस्टमध्ये पुढे श्वेताने लिहिलंय, 'मी खुप चांगल्या पद्धतीने गाणं गायलं आहे, असं ते मला म्हणाले. त्यानंतर ते मला म्हणाले सुनिधी चौहान, शान यांच्यासोबत गाण्याची संधी मी तुला देईन. पण, त्याआधी तू मला किस कर.'
मलिक यांच्या चेहऱ्यावर या वक्तव्यानंतर एक वेगळंच हास्य होतं. ज्यामुळे श्वेता फार घाबरून गेली.
मुख्य म्हणजे श्वेताच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध असूनही अनू मलिक यांनी दुष्कृत्य केलं होतं ही बाब अत्यंत खिन्न करणारी आहे.