मुंबई : काही कलाकार हे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा काही कलाकृती साकारतात की आपण फक्त विचारच करत राहतो आणि ते किमया करुन जातात. अशाच कलाकारांपैकी असणारं एक नाव म्हणजे नागराज मंजुळे. चौकटीबाहेरच्या आणि साचेबद्ध समाजानंही नाकारलेल्या काही मुद्द्यांना नागराजनं चित्रपटांच्या वाटे वाचा फोडली आणि यात आता त्याचा हातखंड झाला. (JHUND Movie)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आताचंच उदाहरण घ्या, जी झोपडपट्टी, एकमेकांना खिटून असणारं घरं, चिंचोळ्या अगदीच निमुळत्या वाटा, मधूनच वाहणारं सांडपाणी किंवा मग नाल्यांवर भर टाकून उभारलेली लहानसहान घरं हे सर्व पाहून काहींना हादरा बसतो. 



काही चौरस फुटांच्या खोलीत राहणारे आपण हे वास्तव पाहून हादरतो. कित्येकांना याची किळसही वाटते. कसे राहतात हे... असा प्रश्न हमखास विचारला जातो. 


याच झोपडपट्टीचा एक वेगळा चेहरा आपणा सर्वांसाठीच नागराज मंजुळे यांनी 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. झोपपट्टीलाही वेगळं ग्लॅमर या चित्रपटातून मिळालं आहे. मुळात हे असं होण्याची पहिली वेळ नाही. 


पण, इतक्या प्रत्ययकारीपणे हा मुद्दा हाताळला गेल्याचं पाहून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 
बिग बी, अमिताभ बच्चन आणि अगदीच नवखे कलाकार अशी मंडळी एकत्र आणत नागराजनं दणक्यात या 'झुंड'चा दणका वाजवला. 


या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. एक ड्रम, काठ्या, पत्र्यांचे डबे या साऱ्याचा एकत्र आवाज त्यातून साकारली जाणारी धून, समोर येणारा नागराज, अमिताभ बच्चन आणि 'झुंड' हे सगळं काही मिनिटांत पण तितक्याच प्रत्ययकारी रुपात दाखवण्यात आलं आहे.


 मुळात 'झुंड' म्हणजे नेमकं काय हेच हा व्हिडीओ सांगून जात आहे, चित्रपट पाहिला आहे त्यांनी आणि नाही पाहिला आहे त्यांनीही या चित्रपटासाठी दाखवलेलं प्रेम, कुतूहल नेमकं का आहे हे व्हिडीओ स्पष्ट सांगून जात आहे.