Amitabh Bachchan यांच्या जावयाचा राजेशाही थाट; कोण आहे श्वेता बच्चनचा पती?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मुलगी, श्वेता बच्चन नंदा सोशल मीडियावर सक्रिय असते. पण, तिचा पती मात्र फारसा प्रकाशझोतात नसतो. पाहा त्याचे काही खास फोटो.
Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाताच हिंदी कलाजगतामध्ये प्रचंड मान आहे. बच्चन कुटुंबीयांचं नाव या कलाविश्वामध्ये सातत्यानं चर्चेत आणि प्रकाशझोतात राहिलं आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांपासून अगदी आराध्यापर्यंत प्रत्येकजण कमालीचं प्रसिद्ध असल्याचं पाहायला मिळतं. पण, यामध्ये एक असाही व्यक्ती आहे जो सहसा माध्यमांसमोर येत नाही. किंबहुना (Bollywood) बी- टाऊनच्या या गर्दीत रमत नाही. ही व्यक्ती म्हणजे अमिताभ आणि जया बच्चन यांचा जावई, श्वेता बच्चनचा पती निखिल नंदा.
एस्कॉर्ट्स ग्रुपच्या अध्यक्षपदी असणाऱ्या (Nikhil Nanda) निखिल नंदाशी श्वेता बच्चननं काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. श्वेताचं आयुष्य लग्नापूर्वी ज्याप्रमाणं Royal होतं, अगदी तसंच किंबहुना त्याहूनही शाही आयुष्य ती लग्नानंतरही जगली. वयाच्या 21 व्या वर्षी (Shweta bachchan nanda) श्वेता बच्चननं निखिलशी लग्नगाठ बांधली होती. 16 फेब्रुवारी 1997 ला त्यांचा विवाहसोहळा पार पडला. तुम्हाला माहितीये का, जो निखिल नंदा प्रसिद्धीझोतापासून दूर असतो तो प्रत्यक्षात एका कलाकारांच्याच कुटुंबातील सदस्य आहे.
कोण आहे निखिल नंदा?
हिंदी कलाजगतात 'शो मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Raj Kapoor) राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांचा मुलगा निखिल नंदा. त्याच्या वडिलांचं नाव राजन नंदा. राजन यांचाही कलाजगताशी थेट संबंध, पण तेसुद्धा प्रसिद्धीझोतात राहणं पसंत करत नाहीत. आपल्या आईवडिलांप्रमाणेच निखिलनंही कायमच साधी राहणी उच्च विचारसरणी यावर भर देत आपल्या कामाला प्राधान्य दिलं. कुटुंबही त्यानं प्राधान्यस्थानी ठेवलं.
हेसुद्धा वाचा : Rahul Roy Birthday : आईसोबत अफेअरच्या अफवा; 'आशिकी' फेम राहुल रॉय 'या' अभिनेत्रींसोबत होता रिलेशनशिपमध्ये
व्यवसायात रमणाऱ्या निखिल नंदाला फार क्वचितच कलाकारांच्या गर्दीत पाहिलं जातं. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य अशी श्वेता आणि निखिलच्या मुलांची नावं. सध्या अगस्त्य कलाजगतात पदार्पणासाठी सज्ज होत आहे, तर नव्या तिचा पॉडकास्ट शो असो किंवा आणखी काही कारण सतत चर्चेत असते.