Piyush Mishra : अभिनेते, गीतकार आणि गायक पियुष मिश्रा हे नाव बॉलिवुडसाठी (bollywood) नवं नाही. मात्र आता सगळ्याच क्षेत्रात आपल्या चौफेर मुशाफिरीने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या पियुष मिश्रा यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियरमध्ये जन्मलेल्या पियुष मिश्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. पण आता त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीमध्ये त्यांच्या आयु्ष्यात घडलेल्या काही धक्कादायक प्रसंगाबद्दल माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते पियुष मिश्रा हे लैंगिक अत्याचाराचा बळी ठरला होते. 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' या (Tumhari Auqaat Kya Hai Piyush Mishra) आत्मचरित्रात पियुष मिश्रा  याचा उल्लेख केला आहे. राजकमल प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. संपूर्ण घटनेचे वर्णन करताना पियुष मिश्रा म्हणाले, "आजच्याच दिवशी सुमारे 50 वर्षांपूर्वी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मी सातवीत असताना माझ्या नातेवाईकाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला." 


ही '50 वर्षे जुनी गोष्ट आहे. मी सातवीत शिकत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. मी पुस्तकात फक्त सत्य लिहिले आहे, पण मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही म्हणून लोकांची नावे बदलली आहेत. त्या घटनेने मला खूप धक्का बसला. जे काही घडले त्याचे मला आश्चर्य वाटले. या गोष्टीने मला धक्का बसला होता. माझ्यासोबत हे घडलय यानेच मी धक्क्यात होतो, असे पियुष मिश्रा म्हणाले.


"सेक्स ही आरोग्यदायी गोष्ट आहे. तुमचा त्याच्यासोबतचा पहिला अनुभव चांगला असावा. नाहीतर ती गोष्ट तुम्हाला आयुष्यभरासाठी घाबरवते. तुम्हाला कायम अस्वस्थ वाटत राहतं. त्या लैंगिक अत्याचाराने मला आयुष्यासाठी कॉम्प्लेक्स दिला. यातून सावरायला मला खूप वेळ आणि अनेक (लैंगिक) जोडीदार लागले, असेही पियुष मिश्रा यांनी म्हटले आहे.


"मला काही लोकांची ओळख लपवायची होती. कारण त्यापैकी काही महिला आहेत. असे काही पुरुष आहेत, जे चित्रपटसृष्टीत महत्त्वाच्या स्थानी आहेत. मला कोणाचा सूड उगवायचा घ्यायचा नव्हता किंवा कोणाला दुखवायचे नव्हते, असाही खुलासा पियुष मिश्रा यांनी केला आहे.


दरम्यान, मिश्रा यांच्या कथेतील पात्रांची नावे खरी नाहीत तर ती बदललेली आहेत. कारण मला फक्त माझी गोष्ट सांगायची आहे. कोणावरही सूड उगवणे हा उद्देश नाही, असे पियुष मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.