Hansika Motwani:  'शकालाका बुमबुम' ( Shaka Laka Boom Boom) या शो मधून घरा-घरात पोहचलेली हंसिका मोटवानी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. शकालाका बुमबुम या मालिकेत तिने करुणा हा रोल प्ले केला होता. जरी ती सध्या अभिनयात सक्रिय नसेल तरी तिचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. हंसिकाने कोई मिल गया या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  हंसिका मोटवानी हिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बाल कलाकार म्हणून तिने अभिनयाला सुरुवात केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुख्य भूमिकेत दिसलेली हंसिका मोटवानी (Hansika Motwani) ने पाच वर्षात अचानक झालेल्या परिवर्तनाने सर्वांनाच चकित केलं होतं. कोई मिल गया या सिनेमात तिने रोहितच्या मैत्रिणीचं पात्र साकारलं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत खूप नाव कमावलं.


या कारणासाठी हार्मोनल इंजेक्शन घ्यावं लागलं
त्यानंतर मीडियामध्ये अनेक अफवा पसरू लागल्या. चित्रपटात मोठं दिसण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचं काहींनी म्हटलं होतं. आताही या अफवा इंटरनेटवर पसरत आहेत, कारण लोकांचा असा समज आहे की, हंसिका मोटवानीची आई, जी dermatologist आहे तिनेच आपल्या मुलीला मोठं दिसावं यासाठी इंजेक्शन दिलं.


हंसिकाला 'आप का सुरुर' या सिनेमामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण या चित्रपटात अभिनेत्रीला पाहून या गोंडस मुलीचं काय झालं? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता कारण ती अचानक वेगळी आणि मोठी दिसू लागली. खरंतर तिला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाली तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. आणि त्यामुळेच तिच्या आईनेच तिला इंजेक्शन दिलं जेणेकरुन ती थोडी मोठी दिसेल.


अभिनेत्री हंसिका मोटवानी तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत (Sohail Kathuria) 5 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे.  अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हंसिका आणि सोहेल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर मोठ्या थाटामाटात त्यांनी लग्न केलं. दोघांनी कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या.