मुंबई: आपल्या समुधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका कविता कृष्णमूर्ती लवकरच एका नव्या इनिंगला सुरुवात करणाऱ असल्याचं कळत आहे. कलाविश्वातील या नव्या इनिंगसाठी खुद्द कृष्णमूर्तीसुद्धा अतिशय उत्सुक असल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी यापूर्वी काही भजनानांना चाल दिली आहे, असं म्हणत त्यांनी एक आठवण जागवली. 


एके दिवशी कारमध्ये असतेवेळी त्यांना एक धुन सुचली. त्यावर काही शब्द असावेत असा विचार त्यावेळी त्यांच्या मनात आला होता. त्याचवेळी त्यांना संत मीरा यांच्या काही भजनांच्या ओळी सुचल्या. ज्या त्या चालीवर अतिशय सुरेखपणे जात होत्या. 


कविता कृष्णमूर्ती यांनी चाल संगीतबद्ध केलेल्या त्या भजानांचं ध्वनीमुद्रण करावं असा सल्ला त्यांना त्यांच्या पतीने दिला. 


आतापर्यंत त्यांनी जवळपास २० गाण्यांचं ध्वनीमुद्रण केल्याची माहितीही आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 


संगीत दिग्दर्शनाचं क्षेत्र हे आपल्यासाठी अतिशय नवं असून, त्यात काम करण्याचा अनुभव अतिशय नवा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता त्यांची ही नवी इनिंग प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.