मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाब लक्षात घेत आजवर अनेकांनीच विविध विषयांवर त्यांची मतं स्पष्टपणे मांडली आहेत. पण, खुलेपणाने मतप्रदर्शन करणं एका बॉलिवूड दिग्दर्शकाला काही अंशी महागात पडल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे खुलेपणाने आणि तितक्याच ठामपणे आपली मतं मांडणं हे त्या दिग्दर्शकाच्या कुटुंबीयांना भोवल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा निर्माता- दिग्दर्शक आहे, अनुराग कश्यप. काही दिवसांपूर्वीच अनुरागने अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी एक नकारात्मक ट्विट केलं होतं. ज्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यात आली होती. किंबहुना लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळी भाजप मोठ्या मताधिक्याने निवडून आली, तेव्हाही अनुरागने ट्विट केल्याचं पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर अनुरागच्या कुटुंबीयांना अज्ञातांकडून धमकावण्य़ात आल्याचं वृत्त समोर आलं. इतकच नव्हे, तर त्याच्या मुलीला बलात्काराची धमकीही देण्यात आली होती. या सर्व परिस्थितीमुळे आता त्याने एक अत्यंच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.



आपल्या कुटुंबीयांना वारंवार धमकावण्यात येत असल्याचं कारण देत त्याने ट्विटरवरुन काढता पाय घेतला. 'ज्यावेळी तुमच्या आई- वडिलांना, मुलीला धमकावण्यात येतं, तेव्हा या मुद्द्यावर कोणीही बोलू इच्छित नाही. काही बोलण्याचं कारणच नाही. धमकावणाऱ्यांचंच राज्य असणार आहे आणि हीच जीवनशैली असणार आहे. अशा या नव्या भारतासाठी मी तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा देऊ इच्छितो', असं एक ट्विट त्याने केलं. 



'हे माझं अखेरचं ट्विट असेल. कारण, कोणत्याची भीतीशिवाय जर मी काही बोलूच शकत नाही, तर हेच योग्य असेल की मी काही बोलूच नये', असं लिहित त्याने नेटकऱ्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देत या माध्यमातून काढता पाय घेतला. 


" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen>