मुंबई :  समलैंगिकतेच्या मुद्द्याला आता समाजाच्या बऱ्याच स्तरांमध्ये स्वीकृती मिळत आहे. अनेकांनी ही बाब मोठ्या मनाने आणि तितक्याच सकारात्मकतेने स्वीकारली आहे. याच मुद्द्यावर बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य म्हणजे त्याने देशात आलेल्या या बदलाचं स्वागत आपण नेमकं कसं केलं होतं याविषयीचा उलगडाही केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समलैंगिकता एक गुन्हा असल्याचं सांगणारं आर्टिकल ३७७ रद्द झाल्यानंतरची आपली प्रतिक्रिया कशी होती, हे करणने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं.  'द इंडिया टुडे कान्क्लेव्ह २०१९'मध्ये तो बोलत होता. 


'मी नुकताच उठलो होतो आणि (तो निर्णय ऐकून) मला रडूल आलं. मला समाजातील त्या एका घटकासाठी रडू आलं. सरतेशेवटी स्वातंत्र्य पाहायला मिळालं या वास्तवापोटी मला रडू आलं. या साऱ्याला पाठींबा देणाऱ्या देशाच एकसमान प्रेमाची जाणिव होती. तो खरंच एक ऐतिहासिक निर्णय होता', असं म्हणत समलैंगिकतेला कायदेशीररित्या स्वीकृती मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. 


रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे सोनाक्षी सिन्हा ट्रोल


एक भारतीय म्हणून येत्या काळात समलैंगिक विवाहांना भारतात परवानगी मिळावी अशी मी आशा करतो, असं म्हणत हा बदलही लवकरच घडेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. समलैंगिक संबंध आणि अशा इतरही मुद्द्यांवर करणने कायमच त्याच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. आपल्या खासगी आयुष्यात या साऱ्याचा कुठवर आणि किती परिणाम होतो याचाही खुलासा त्याने केल्याचं पाहायला मिळालं.