मुंबई : शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईत चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला अटक करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते वासू भगनानी यांना ३२ कोटींचा गंडा घतल्याप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेन्मेन्ट या कंपनीकडून प्रेरणाने एका चित्रपटाच्या हक्कांसाठी ही रक्कम घेतली होती. त्याशिवाय तिने इतरही बऱ्याच गुंतवणूकदारांकडून चित्रपटांच्या हक्कांसाठीचे पैसे घेतले होते. अक्षय कुमारच्या 'टॉयलेट- एक प्रेम कथा', 'पॅडमॅन' या चित्रपटांच्या निर्मितीमध्येही तिचं नाव जोडलं गेलं होतं. 


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांना या साऱ्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर गुंतवणूकदारांविषयी काहीच माहिती नव्हती. हे एकंदर प्रकरण पाहता आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेकडून प्रेरणाला ताब्यात घेण्यात आलं. 
भगनानी यांनी केलेल्या दाव्यानुसार क्रिअर्ज एंटरटेन्मेन्टकडून त्यांना 'फन्ने खान' आणि 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटांसाठीचे समान हक्क देण्यात आले होते. 


प्रेरणा अरोरा

दरम्यान, प्रेरणाचं नाव यापूर्वीही अनेकदा अशाच गंभीर आरोपांअंतर्गत समोर अल्याचं पाहायला मिळालं होतं. चित्रपट निर्मितीच्या व्यवहारातील अफरातफर, त्याशिवाय एकाहून अधिक पासपोर्ट बाळगणं अशा प्रकरणांमध्ये तिचं नाव समोर आलं होतं. तेव्हा आता तिच्यावर नेमकी पुढील कारवाई काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.