मुंबई : 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी गैरवर्तणूक झाल्याचं म्हणत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यांवर काही गंभीर आरोप केले होते. तिने केलेल्या आरोपांनंतर संपूर्ण कलाविश्वात #MeToo चं उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्या वादाला बरीच वळणं मिळाली. आरोप-प्रत्यारोपांच्या या सत्रात अभिनेत्री आणि 'आयटम गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हिनेही काही वक्तव्य करत सर्वांचच लक्ष वेधलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखीच्या वक्तव्यांनंतर या वादाला मिळालेलं हे आणखी एक वळण ठरलं. तनुश्री हे सारंकाही प्रसिद्धीसाठी करत असल्याचं म्हणणाऱ्या राखीने आता इन्स्टाग्रामवर एक व्हिड़िओ पोस्ट करत आणखी एका विषयाला वाचा फोडली आहे. 


तनुश्री आता अमेरिकेला परतली आहे, हीच बाब अधोरेखित करत तिने हे सारंकाही व्हिसा मिळवण्यासाठीच केलं असल्याचा आरोप तिने केला. तनुश्रीचा एक कॅनडियन प्रियकर आहे. याकडेच लक्ष वेधत तिने व्हिसा मिळावा म्हणून ज्यावेळी प्रश्न विचारण्यात येईल तेव्हा भारततील नेतेमंडळींकड़ून आपल्याला धोका असल्याचं कारण पुढे करत व्हिसा मिळवण्यासाठीच तिने हे सारं नाटक रचल्याचं राखी म्हणाली.



पोलिसांकडूनच आपल्याला याविषयीची माहिती मिळाल्याचंही ती या व्हिडिओमध्ये म्हणत असून, देशवासियांसोबत आणि आपल्या देशासोबत चुकीच्या पद्धतीने वागण्याऱ्या तनुश्रीला खडे बोल सुनावत असल्याचं पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ नेमका आता का प्रकाशझोतात आला आहे, हा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे. मुख्य म्हणजे राखीचा हा व्हिड़िओ पाहता आता नेमकं  नाटक करतंय कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे, त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणत्या वळणावर थांबणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.