मुंबई : बॉलिवूडमध्ये  करियर करायला, प्रसिद्धी मिळवायला प्रत्येकाला वाटतं पण अशी संधी काहीचं लोकांना  मिळते. अशीच सुवर्ण संधी अभिनेता रणवीर सिंगच्या आजीला देखील मिळाली होती. पण बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी आलेल्या सर्वांनाच यश मिळतं असं नही. काहींना अपयशाचा देखील सामना करावा लागतो. रणवीरच्या आजीला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला पण वाट्याला यश मात्र आलं नाही. रणवीरची आजी चांद बर्क पंजाबी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबी सिनेविश्वात नाव कमावल्यानंतर रणवीरच्या आजीला बॉलिवूडचे दिग्गज राज कपूर यांनी ब्रेक दिला होता. 1954 साली प्रदर्शित झालेल्या 'बूट पॉलिश' सिनेमाच्या माध्यमातून चांद यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात त्यांनी एका वाईट महिलेची व्यक्तिरेखा साकारली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. 


चांद यांनी 50 आणि 60 च्या दशकात अनेक भुमिका साकारल्या. अभिनय कौशल्य उत्तम असताना देखील त्यांना बॉलिवूडमध्ये हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. पण  पंजाबी सिनेविश्वात त्यांचा बोलबाला होता. रणवीरच्या आजीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. रवणवीरची  आजी चांद यांचा पहिला विवाह दिग्दर्शक निरंजन यांच्यासोबत झाला. पण हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 


पहिल्या पतीसोबत विभक्त झाल्यानंतर चांद यांनी उद्योगपती सुंदर सिंग यांच्यासोबत लग्न केलं. सुंदर  सिंग हे रणवीर सिंगचे आजोबा आहेत. तर रणवीर त्यांच्या आजी सारखाचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


रणवीर बॉलिवूडमधील अनेक सिनेमे स्वतःच्या नावावर केले आहेत. 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', ' सिंबा', 'गली ब्वॉय' यांसारख्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्याचप्रमाणे रणवीर त्याच्या ड्रेसिंग स्टायलमुळे सतत चर्चेत असतो.