मुंबई : बॉलिवूड स्टार्सचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आतापर्यंत आपण अनेक स्टार्सचे नेट वर्थ जाणून घेतलं होतं. आज आम्ही तुम्हाला चित्रपट जगतातील अशा जोडप्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांची गणना सर्वात श्रीमंत जोडप्यांमध्ये केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान आणि गौरी खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान देखील संपत्तीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत. शाहरुख हा चित्रपट जगतातील मोठा सुपरस्टार आहे, तर गौरी खान देखील एक यशस्वी इंटिरियर डिझायनर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडीची एकूण संपत्ती $690 दशलक्ष आहे. 2021 मध्ये फोर्ब्सच्या यादीत शाहरुख खानची एकूण संपत्ती सुमारे 5000 कोटी असल्याचे सांगण्यात आले.


रणवीर सिंह और दीपिका पादुकोण
बॉलीवूडचे बाजीराव आणि मस्तानी देखील पैशाच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीत. अलीकडेच, या जोडप्याने स्वतःसाठी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ 119 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे घर विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कपलची एकूण संपत्ती 310 कोटींच्या आसपास आहे. तथापि, काही अहवालांमध्ये दोघांची एकूण संपत्ती 500 कोटींहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.


करीना कपूर आणि सैफ अली खान
बॉलिवूडमध्ये सैफीना नावाने ओळखले जाणारे हे जोडपे सर्वात श्रीमंत जोडप्यांमध्ये गणले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त सैफकडेच 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये करीना कपूर खानकडे 470 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे.


अक्षय कुमार और ट्विंकल खन्ना 
बॉलीवूडमधील श्रीमंत जोडप्यांचा विचार केला तर बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांचे नाव कसे विसरता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये या जोडप्याची एकूण संपत्ती 48.5 दशलक्ष इतकी होती.