मुंबई : बॉलीवूडमधील सेलिब्रिटिंचे आपल्या कोस्टारसोबोत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक बातम्या आपण एकल्या आहेत. त्यांपैकी काही बातम्या या फेक असतात. तर काही बातम्या या खऱ्या असतात. आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, ज्यांनी बॉलिवूडमधील सेलिब्रिटि आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडते. जसे की ते काय करतात? कुठे जातात? कोणाला भेटतात इ. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत. जे त्यांच्या कोस्टार्स सोबत बेडरुममध्ये रंगेहात पकडले गेले आहेत.


करिश्माने अजय-काजोलला पकडले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट ९० च्या दशकातील आहे, जेव्हा करिश्मा कपूर आणि अजय देवगणचे नाते चर्चेत होते. पाच चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. मात्र अजयने या नात्याला गांभीर्य न घेतल्यामुळे त्याचं नातं संपलं.


करिश्माच्या अजयला फोनवर कोणत्या तरी महिलेचा आवाज ऐकू आला, ही महिला होती काजोल. खरंतर त्यावेळी काजोल अजयच्या बेडरूममध्ये होती, जेव्हा करिश्माला हे कळाले तेव्हा, तिला खूप राग आला, शेवटी करिश्माने अजयसोबतचे सर्व संबंध तोडले. यानंतर अजयने 1999 मध्ये काजोलसोबत लग्न केलं.


मनीषाने नाना पाटेकर-आयेशा जुल्काला पकडले


मनीषा कोईराला एकेकाळी तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेले अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पण नाना पाटेकर यांचा रागीट आणि सकारात्मक स्वभाव, तसेच अभिनेत्री आयेशा जुल्कासोबतचे नाते यामुळे मनिषा आणि नाना यांचं नातं फार काळ टिकलं नाही.


एकेदिवशी मनीषाने नाना आणि आयशाला हॉटेलच्या एका खोलीत पकडलं, ज्यानंतर हॉटेलमध्ये चांगलाच गोंधळ झाला.


शाहिदने प्रियांका चोप्राच्या घराचा दरवाजा उघडला


आम्ही 2011 मधील एका घटनेबद्दल बोलत आहोत जेव्हा इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता प्रियंका चोप्राच्या घरावर छापा टाकला होता. पण या सगळ्यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यावेळी प्रियांकाच्या घराचे दार शाहिद कपूरने उघडले, या सगळ्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.


पण प्रियांकाने असं काहीतरी बोलून सगळं प्रकरण हाताळलं की, काहींनी त्यावर विश्वास ठेवला. प्रियांकाने सांगितले की, जेव्हा इनकम टॅक्स वाले घरी आले तेव्हा प्रियांकाला काहीही सुचले नाही, तेव्हा तिने आपल्या आईला फोन केलं परंतु तिने फोन न उचलल्यामुळे तिने शाहिदला कॉल केला, शाहिद प्रयांकाच्या घरापासून तीन मिनीटांच्या अंतरावर राहात असल्यामुळे तो प्रियांकाच्या मदतीसाठी धावून आला.


जेव्हा रिपोर्टरने राणी-गोविंदाला बेडरूममध्ये एकत्र पाहिले


रिपोर्ट्सनुसार, राणी आणि गोविंदा 'हद कर दी आपने'च्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यावेळी गोविंदा विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता. त्यावेळी गोविंदा आपल्या घरच्यांना न सांगता राणीला येऊन भेटायचा.


एकेदिवशी जेव्हा एक  रिपोर्टर मुलाखत घेण्यासाठी राणीच्या घरी पोहोच, तेव्हा  गोविंदा ड्रेस घालून बेडरूममधून बाहेर जाताना दिसला.


खरंतर गोविंदा आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन राणीशी लग्न करण्यास तयार नव्हता, ज्यामुळे शेवटी गोविंदा आणि राणी यांचं ब्रेकअप झालं.


संजय दत्त सुष्मिता सेनच्या खोलीत पकडला गेला


संजय दत्त आणि सुष्मिता सेन एका शुटींग दरम्यान भेटले,  त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. हे प्रकरण एवढ्यापर्यंत पोहोचले होते की, एकदा संजय दत्त सुष्मिता सेनसाठी परदेशात पोहोचला होता आणि तिच्या खोलीत थांबला होता.


यादरम्यान, जेव्हा एक रिपोर्टर मुलाखतीसाठी सुष्मिताच्या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला, तेव्हा संजय दत्त सुष्मिता सेनचा हात धरून बसलेला दिसला. ज्यानंतर या सगळ्याचा परिणाम संजय दत्तच्या लग्नावर देखील झाला.