मुंबई : अभिनेता शाहिद कपूर याच्या आगामी 'जर्सी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं लगेचच माध्यमांशी संवादही साधला. 'कबीर सिंग' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहिद अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांकडे गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे गेला होता. पण, पुढे काय झालं हे शाहिदच जाणतो. 


'कबीर सिंग प्रदर्शित झाल्यानंतर मी सर्वांकडे भिकाऱ्यासारखा गेलो. 200-250 कोटी रुपयांची कमाई करणारे चित्रपट साकारणारी ही ती मंडळी होी. मी कधीही या लोकांपैकी एक नव्हतो. त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी नवं होतं. 


15-16 वर्षांमध्ये इतका कमाई करणारा चित्रपट मला मिळाला नव्हता. त्यामुळे नेमकं कोणाकडे जावं हे मला ठाऊक नव्हतं. माझ्यासाठी हे सारं नवं होतं. मी असं न करण्याचा फार प्रयत्नही केला', असं शाहिद म्हणाला. 


शाहिदला 'जर्सी' या चित्रपटाची ऑफर सुपरहिट 'कबीर सिंग'च्याही आधी आली होती. या चित्रपटासाठी आपली निवड केल्याबद्दल त्यानं दिग्दर्शक गौतम यांचे आभार मानले. 


चित्रपटासाठी आपली प्रतीक्षा केल्याबद्दल त्यानं दिग्दर्शकांचे आभार मानले. शिवाय हा आतापर्यंतचा आपला सर्वात चांगला चित्रपट असल्याचं सांगत त्यानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली.