COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलिवूडमधील काही नामवंत कुटुंबांमध्ये येणारं एक नाव म्हणजे ‘खान’. बॉलिवूडच्या खानांमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची नावं सहसा घेतली जातात. तरीही इथे मात्र सलमान नव्हे तर सैफ अली खानच्या नावाची चर्चा सुरु आहे. इथे आपण अशा कलाकारांबद्दल बोलत आहोत ज्यांनी लग्नानंतर एक अतिशय महत्त्वाचं काम केलं.


या कामामुळे त्यांचं नशीबच पालटलं. हे काम म्हणजे बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात. या सर्व कलाकारांनी आपल्या लग्नाची गोष्ट लपवून न ठेवता एक विवाहित अभिनेता म्हणूनच अभिनय विश्वात पदार्पण केलं.


शाहरुखने 1991 मध्ये गौरी खानशी लग्न केलं, पुढे 1992 मध्ये त्याचा पहिला चित्रपट 'दीवाना' रिलीज झाला होता. लग्न झाल्यामुळे त्याच्या कारकिर्दीत कधीच फरक पडला नव्हता.


16 वर्षीय डिंपल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत तिचा पहिला चित्रपट बॉबी रिलीज होण्याच्या सहा महिने आधी लग्न केलं होतं. लग्नानंतर केवळ तिचे चित्रपटच नाही तर तीसुद्धा हिट ठरली आणि तिनं अनेक दमदार चित्रपट दिले.


‘यादों की बारात’मध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या आमिर खानने 1988 मध्ये ‘कयामत से कयामत तक’मधून पदार्पण केलं होतं. पण, या चित्रपटापूर्वी म्हणजेच 1986 मध्ये, त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या दोन वर्षांपूर्वी त्याने रीना दत्तासोबत लग्न केलं होतं.


अभिनेता आणि व्हिजे आयुष्मान खुराना चित्रपटांमध्ये एंट्री करण्यापूर्वीच विवाहित होता. 2011 मध्ये त्याने गर्लफ्रेंड ताहिरा कश्यपसोबत लग्न केलं होतं.


बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या सैफ अली खान याने 12 वर्षांहून मोठ्या असणाऱ्या अभिनेत्री अमृता सिंगसोबत 1991 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षानंतर सैफने 1993 मध्ये 'आशिक आवारा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.