मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्यासमोर असणारा अडचणींचा डोंगर दिवसागणिक आणखी मोठा होताना दिसत आहे. पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिल्पानं माध्यमांसमोर येणंही टाळलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याच काळानंतर तिनं आपल्या रेंगाळलेल्या कामांना मार्गी लावलं, पुढं सोशल मीडियावरही ती सक्रिय झाली. सूत्रांच्या माहिचीनुसार सध्या माध्यमांसमोर येऊ लागलेल्या शिल्पानं कोणत्याही वादग्रस्त प्रश्नाचं उत्तर न देण्याची अट ठेवली आहे. 


एकीकडे खाससी जीवनात वादळांची साखळी मोठी आणि अधित भक्कम होत असतानाच दुसरीकडे शिल्पा आता सर्वस्वी स्वत:ला कामात झोकून देताना दिसत आहे. सध्या सुरु असणाऱ्या चर्चा आणि काही माध्यमांच्या वृत्तानुसार शिल्पा पती, राज कुंद्रा याचं घर सोडून मुलांना घेऊन वेगळी राहण्यास सुरुवात करणार आहे. पोर्नोग्राफी प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या चित्रविचित्र चर्चानंतर मानसिक आव्हानं झेलणाऱ्या शिल्पाच्या या निर्णयाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र अद्यापही समोर आलेली नाही. 


शिल्पा आणि राजच्या नात्याला तडा गेल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या असून, यावर आता अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण उघकीस आल्यानंतरपासूनच शिल्पानं राजच्या कमाईला आपल्यापासून दूरच ठेवलं. 


पोर्नोग्राफी प्रकरणात पतीचं नाव आल्यानंतर शिल्पाचं मोठं वक्तव्य, अखेर ते शब्द म्हणालीच...


 


मुलांची काळजी घेण्यासाठी आपण खंबीर असून, आता याच जबाबदारीखातर शिल्पानं तिच्या कामाला नव्या जोमानं सुरुवात केली आहे. बऱ्याच नव्या प्रोजेक्ट्सबाबत ती चर्चा करत असून त्यासंदर्भातले निर्णयही घेत आहे. 


शिल्पाची 'ती' पोस्ट बरंच बोलून गेली.... 
शिल्पानं नुकतंच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचं पान शेअर केलं होतं. ज्यामध्ये जीवनातील चुकांबाबतचा संदेश लिहिला होता. तिची ही पोस्ट खूप काही बोलून गेली. तिनं शेअर केलेल्या सोफिया लॉरेनच्या एका कोटमध्ये लिहिलं होतं, 'जीवनातील चुका या कोणा एका कर्जाचाच एक भाग असतात. जे कर्ज आयुष्यभर फेडायचं असतं. आपण काहीही चूक न करता जीवन सुरेखपणे व्यतीत करु शकत नाही. आपण आशा करतो की या चुका भयावह किंवा कोणाला इजा पोहोचवणाऱ्या नसाव्यात तरीही या चुका असाव्यात.'