पोर्नोग्राफी प्रकरणात पतीचं नाव आल्यानंतर शिल्पाचं मोठं वक्तव्य, अखेर ते शब्द म्हणालीच...

आता शिल्पा पुढे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष 

Updated: Aug 27, 2021, 04:41 PM IST
पोर्नोग्राफी प्रकरणात पतीचं नाव आल्यानंतर शिल्पाचं मोठं वक्तव्य, अखेर ते शब्द म्हणालीच...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) मागील काही दिवसांपासून अडचणींच्या फेऱ्यात अडकला आहे. राज कुंद्राचं नाव पोर्नोग्राफी प्रकरणात गोवलं गेल्याचा धक्कादायक खुलासा झाला आणि पाहता पाहता या प्रकरणातीच धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. 

सध्या राज कुंद्रा या प्रकरणात कारागृहात आहे, तर त्याच्या कुटुंबाच्या हालचालींवर माध्यमांच्या नजरा आहेत. (Pornography) अश्लील व्हिडीओ प्रकरणामध्ये राजचं नाव पुढे आल्यानंतर त्याची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी  हिनं काही काळ सोशल मीडिया आणि माध्यमांपासून दूर राहण्याला प्राधान्य दिलं. एका रिअॅलिटी शोमधून तिनं परीक्षकांच्या भूमिकेतूनही काही काळ सुट्टी घेतली होती. पण, आता मात्र तिचं आयुष्य पूर्वपदावर येत असल्याचं चित्र आहे. 

काही दिवसांपूर्वीच शिल्पानं रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी शिल्पानं पुन्हा एकदा आपली जबाबदारी सांभाळली होती. आता सोशल मीडियावरही ती पुन्हा सक्रिया होऊ लागली आहे. पण, शिल्पाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून या साऱ्या परिस्थितीचा तिच्या मनावर फार परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 

पाटलांच्या लेकीचं काम भारी; बिग बींचा लूक ठरवण्यासाठी काय केलं पाहा

 

शिल्पानं नुकतंच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका पुस्तकाचं पान शेअर केलं ज्यामध्ये जीवनातील चुकांबाबतचा संदेश लिहिला आहे. सोफिया लॉरेनच्या एका कोटमध्ये लिहिलं आहे, 'जीवनातील चुका या कोणा एका कर्जाचाच एक भाग असतात. जे कर्ज आयुष्यभर फेडायचं असतं. आपण काहीही चूक न करता जीवन सुरेखपणे व्यतीत करु शकत नाही. आपण आशा करतो की या चुका भयावह किंवा कोणाला इजा पोहोचवणाऱ्या नसाव्यात तरीही या चुका असाव्यात.' 

शिल्पानं हा मेसेज शेअर करताना एक अॅनिमेडेटड स्टीकरही शेअर केलं. ज्यामध्ये हो मी एकदा चुकले, पण काहीच हरकत नाही असं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे. या स्टोरीपूर्वी शिल्पानं एक सकारात्मक मेसेजही शेअर केला होता. तिच्या या पोस्ट आणि एकंदरच त्यातून मिळणारे संदेश पाहता जीवनाच्या या टप्प्यावर शिल्पा काही मोठा निर्णय घेते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.