बच्चन यांच्या लेकिला आवडायचा `हा` अभिनेता; का नाही होऊ शकलं लग्न?
एका नात्याची दुसरी गोष्ट
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं त्यांच्या परिनं या कलाजगतामध्ये योगदान दिलं आहे. एकिकडे कुटुंबाची कलाक्षेत्रातील कारकिर्द सुरु असतानाच दुसरीकडे त्यांची मुलगी श्वेतचा बच्चन नंदा ही मात्र तिची वेगळी ओळख सांभाळून आहे. (Shweta bachchan)
श्वेता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरीही तिचा कलाजगतामध्ये असणारा वावर सर्वांचं लक्ष वेधणारा ठरतो. श्वेतानं डिझायनर म्हणून स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासोबतच कुटुंबावरही तितकंच लक्ष दिलं.
तुम्हाला माहितीये का, बच्चन यांची ही लेक एका बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात होती. तिला तो प्रचंड आवडत होता.
एका मुलाखतीदरम्यानच तिनं हा खुलासा केला होता. शालेय वयात असताना आपल्याला सलमान खान हा अभिनेता फार आवडायचा असं श्वेतानं सांगितलं होतं.
सलमानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट तिला इतका आवडला होता, की तिनं त्यात असणारी FRIEND लिहिलेली टोपीही घालत हे प्रेम व्यक्त केलं होतं.
श्वेताला हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करणं मुळीच कठीण नव्हतं. पण, तिनं करिअरच्या वेगळ्या वाटा निवडल्या. श्वेता पत्रकारिता, होस्ट, मॉडेल आणि आता डिझायनर अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय होती.
अभिनेता सलमान खान याच्यावर भाळणाऱ्यांची संख्या कमी नाही. किंबहुना या अभिनेत्याच्या अफेअर्सबाबत सांगावं तर ही संख्यासुद्धा काही कमी नाही. पण श्वेता बच्चनला तो आवडणं म्हणजे मोठी बाब नाही का? हा मुद्दा, किंबहुना ही आवड लग्नापर्यंत पोहोचण्याचा मुद्दाच नव्हता. पण, तरीही या नात्याची चर्चा मात्र फार झाली.